शिजानच्या ‘सिक्रेट गर्लफ्रेंड’चा फोन केला जप्त; जामिनावर उद्या पुन्हा सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2023 07:22 AM2023-01-08T07:22:44+5:302023-01-08T07:22:58+5:30

तुनीषाचा परिवार चंडीगड येथे अंतिम संस्काराच्या काही पूजा व शांतीपाठसाठी गेलेला आहे.

Shijan Khan bail hearing again tomorrow; Actress Tunisha Sharma Suicide Case | शिजानच्या ‘सिक्रेट गर्लफ्रेंड’चा फोन केला जप्त; जामिनावर उद्या पुन्हा सुनावणी

शिजानच्या ‘सिक्रेट गर्लफ्रेंड’चा फोन केला जप्त; जामिनावर उद्या पुन्हा सुनावणी

googlenewsNext

नालासोपारा : टीव्ही अभिनेत्री तुनीषा शर्मा मृत्यूप्रकरणी आरोपी अभिनेता शिजान खानच्या जामीन अर्जावर शनिवारी वसई न्यायालयात सुनावणी झाली. मात्र, ही चर्चा पूर्ण झाली नाही. त्यामुळे न्यायालयाने पुढील तारीख ९ जानेवारी निश्चित केली आहे. आता दोन दिवसांनी या खटल्यात दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून त्यानंतर तुरुंगात राहायचे की जामीन याचा निर्णय होणार आहे. 

तपास अधिकाऱ्याने याप्रकरणी आपले म्हणणे वसई न्यायालयात सादर केलेले नाही.  दुसरीकडे, ३१ डिसेंबरला न्यायालयाने शिजानच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची म्हणजेच १३ जानेवारीपर्यंत वाढ केली होती. शिजान खान सध्या ठाणे येथील मध्यवर्ती तुरुंगात आहे. शिजानच्या जामीन अर्जावर सुनावणी दरम्यान न्यायालयात सरकारी वकिलांनी जामिनाला विरोध केला. तुनीषाचा परिवार चंडीगड येथे अंतिम संस्काराच्या काही पूजा व शांतीपाठसाठी गेलेला आहे.

तसेच तिचे वकील ही उच्च न्यायालयात एका प्रकरणाच्या सुनावणीसाठी गेल्याचे वसई न्यायालयाला त्यांनी निदर्शनास आणून दिले. सुनावणी दरम्यान असा युक्तिवाद करण्यात आला की, शिजानने त्याचे अनेक व्हॉट्सॲप चॅट्स डिलीट केले होते. जे नुकतेच त्याच्या अन्य मैत्रिणीच्या फोनवरून मिळविले आहेत. या प्रकरणाचा अजून तपास होणे बाकी आहे.

तुनीषाचा सहकलाकार आणि प्रियकर शिजानवर अभिनेत्रीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. त्यामुळे त्याला वसई न्यायालयाने जानेवारीत १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. कोर्टात शिजानच्या वकिलाने तो निर्दोष असल्याचे सांगितले. शिजान आणि त्याचे कुटुंबीय पोलिसांच्या नाकर्तेपणाचे बळी आहेत. न्यायव्यवस्थेवर आम्हाला पूर्ण विश्वास आहे. पोलिसांनी अटकेच्या अधिकाराचा गैरवापर वापर केल्याचे शिजानचे वकील शैेलेंद्र मिश्रा यांनी पत्रकारांना सांगितले. 

‘सिक्रेट गर्लफ्रेंड’चा फोन केला जप्त

पोलिसांनी शिजान आणि त्याची ‘ गुप्त मैत्रीण ‘ यांच्या चॅट्स परत मिळवल्या आहेत. या चॅट्स शिजानने तिच्या मोबाइलवरून डिलीट केल्या होत्या. डिलीट केलेल्या चॅट्स परत मिळवण्यासाठी वालीव पोलिसांनी शिजानच्या गुप्त मैत्रिणीचा फोन नुकताच जप्त केला होता. शिजान इतर अनेक मुलींशी ही बोलल्याचे समोर आले आहे.

Web Title: Shijan Khan bail hearing again tomorrow; Actress Tunisha Sharma Suicide Case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.