विक्रमगडच्या बाजारपेठेत अजूनही शुकशुकाट

By admin | Published: January 23, 2017 05:13 AM2017-01-23T05:13:29+5:302017-01-23T05:13:29+5:30

अजूनही या परिसतील एटीएम व बॅकांमध्ये पुरेसे चलन उपलब्ध होत नसल्याने विक्रमगड तालुक्यातील ९५ गावपाडयातून

Shikkukkat still in Vikramgad market | विक्रमगडच्या बाजारपेठेत अजूनही शुकशुकाट

विक्रमगडच्या बाजारपेठेत अजूनही शुकशुकाट

Next

विक्रमगड : अजूनही या परिसतील एटीएम व बॅकांमध्ये पुरेसे चलन उपलब्ध होत नसल्याने विक्रमगड तालुक्यातील ९५ गावपाडयातून जवळजवळ २० किलोमीटरहून आलेल्या खातेदारांना अदयापही अडचणींचा सामना करावा लागतो आहे़. बॅकांमधून आठवडयाला फक्त २४ हजार रुपये काढण्याचे निर्बंध आहेत. परंतु तेवढे चलन बँकात नसल्याने त्या देतील तेवढेच पैसे ठेवीदारांना स्वीकारावे लागत आहे. त्यामुळे ग्राहकांत संताप आहे, अदयापही ग्राहकांची मोठी गैरसोय होत असल्याने येथील बाजारपेठेतील मंदी अजूनही कायम आहे. सोमवार व बुधवार सोडले तर बाकीच्या दिवसांत बोहोणीसुध्दा होत नसल्याच्या तक्रारी व्यापारीवर्गाकडून होत आहेत़ याबाबत कॉग्रेस व राष्ट्रवादीने आंदोलन देखील केले मात्र अजूनही स्थितीत फारसा फरक पडलेला नाही. याचा मोठा फटका नागरिंकाना व त्यामुळे व्यापारी वर्गाला बसतो आहे़
दरम्यान जुना नोटांची मुदत संपून बॅकेत ग्राहकांच्या जुना नोटा बदलुन रक्कम खात्यावर जमा झाली आहे़ आता खात्यातून पैसे काढतांना आपण मागू तेवढ्या नविन नोटा मिळणार या आशेवर सर्वानीच आपल्या आपल्या गरजेच्या कामांना सुरुवात केली होती. यात घर दुरुस्ती, शेतीपंप दुरुस्ती, नवीन औजारांची खरेदी, औषधे, नविन घर बांधणी, शाळा, कॉलेजची फी, अशी अनेक महत्वाची जी कामे नोटा बंदीच्या काळात झाली नव्हती. ती आता होतील अशी ठेवीदारांची अपेक्षा होती ती फोल ठरली आहे.
कित्येक नागरिकांना आजही बॅकांमध्ये तासनतास रांगा लाऊनही हातामध्ये तुटपुंजी रक्कम पडते आहे़ अजूनही याभागातील बॅकेमध्ये दुपारनंतर पैसे नसल्याने रिकाम्या हाती परतावे लागत आहे़
नोकरदारांनी सांगीतले की, आम्हांस आजारपणाकरीता तसेच आॅपरेशन करीता पैशांची अत्यंत गरज आहे. आमच्या खात्यामध्ये पैसे देखील आहेत़ परंतु बॅकेकडे पैसे नसल्याने व आठवडयाकरीता फक्त २४ हजार रुपये काढण्याची मुभा असली तरी तेवढेही पैसे बँक देत नसल्याने पैसे कसे उभे करायचे? अशी मोठी अडचण आहे़ सर्वाचीच ही परिस्थीती असल्याने कुणाकडे उसनवारी मागितली तर त्याचेजवळ देखील रोख रक्कम नसल्याने अडचणीमध्ये अजूनही भर पडत आहे़
आदिवासी व दुर्गम भागात असलेल्या विक्रमगड या भागातील सामान्य माणूस आदिवासी, अशिक्षीत शेतकरी, शेतमजूर, अजूनही गोंधळला आहे़ कारण त्याच्याकडे जी काही तुटपूंजी रक्कम जमवली आहे़ ती त्यांनी बँकेत भरलेली आहे व ती रक्कम अडीअडचणींमध्ये उपयोगी यावी करीता त्याची आजही धडपड चालू त्यामुळे सर्वच बँकामध्ये आजही गर्दी आहे. सकाळपासून ते सायंकाळपर्यत गर्दी कायम आहे, त्यात आदिवासी स्त्री-पुरुषांची संख्या जास्त दिसते़
(वार्ताहर)

Web Title: Shikkukkat still in Vikramgad market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.