जव्हारमध्ये पाहिले शिवभोजन केंद्र सुरू; लॉकडाऊनपर्यंत 5 रुपये थाळी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2020 04:12 PM2020-04-01T16:12:20+5:302020-04-01T16:29:15+5:30

जव्हार येथील कुटीर रुग्णालयाशेजारी  200 थाळी जेवण तयार करून गरजूंना कमी पैशात जेवण अशी शिवभोजन योजना अंतर्गत केंद्र सुरू केले आहे.

shiv bhojan thali started in jawhar palghar SSS | जव्हारमध्ये पाहिले शिवभोजन केंद्र सुरू; लॉकडाऊनपर्यंत 5 रुपये थाळी

जव्हारमध्ये पाहिले शिवभोजन केंद्र सुरू; लॉकडाऊनपर्यंत 5 रुपये थाळी

Next

हुसेन मेमन

जव्हार - जव्हारमध्ये कुटीर रुग्णालया शेजारी पाहिले शिवभोजन केंद्र सुरू झाले आहे. गोरगरीब जनतेला याचा चांगला फायदा होणार असून त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र शासनाने गरिबांना 10 रुपयात पोटभर जेवण देण्याकरीता शिवभोजन योजना सुरू केली असून त्यांची सुरवात जव्हार येथील स्वामींनी महिला बचत गट यांनी सुरू केली आहे. 

पुरवठा विभागाने जव्हार येथील कुटीर रुग्णालयाशेजारी  200 थाळी जेवण तयार करून गरजूंना कमी पैशात जेवण अशी शिवभोजन योजना अंतर्गत केंद्र सुरू केले आहे. यामध्ये 2 चपाती, 1 वाटी भाजी, 1 वाटी वरण व भात असे जेवण सुरू केले आहे. मात्र सध्या कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने रोज काम करून आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे, अशातच या शिवभोजन योजनेमुळे त्यांना पोटभर जेवण लॉकडाऊनच्या काळात फक्त 5 रुपयांत मिळणार आहे, त्यामुळे गरजूंना याचा उपयोग होणार आहे.

जव्हार तालुका हा 95 टक्के आदिवासी तालुका असून खेडोपाड्यातून शेकडो गरीब रुग्ण रोज कुटीर रुग्णालयात दाखल होतात, त्यांना जेवणाची कुठलीच सोया नव्हती, त्यांची परिस्थितीही अतिशय बिकट असते, अशात त्यांच्यासोबत त्यांचे काही  नातेवाईकांना सुद्धा येतात त्यामुळे या शिवभोजन योजनेमुळे त्यांना चांगला फायदा होणार आहे. 

शिवभोजन कार्यपद्धती

शासनाकडून शिवभोजन अ‍ॅप दिलेला असून जेवणासाठी आलेला व्यक्तीचे थाळी वाटप करून त्यांचा फोटो अपलोड करणे, तसेच हे जेवण कुठल्याही समाजाच्या गरजूसाठी आहे, हे जेवण शासकीय नोकरदारासाठी नाही.

बुधवारपासून आम्ही शिवभोजन थाळी सुरू केली असून त्याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे, शहरातील कुठल्याही गरजूंना येथे जेवण मिळेल. जे बाहेर गावातील कामगार जव्हारमध्ये आहेत अशा व्यक्तींनाही शिवभोजन मिळेल.

- संगीता माळगावी, अध्यक्ष, स्वामींनी महिला बचतगट

महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus : दारुच्या नशेत त्यांनी केला थेट माजी मंत्र्यांनाच मेसेज अन्...

Gas Cylinder's New Price : सर्वसामान्यांना दिलासा! गॅस सिलिंडरच्या किमती झाल्या कमी, जाणून घ्या नवे दर

Coronavirus : 'मरण्यासाठी मशिदीपेक्षा चांगली जागा नाही', मौलानांची 'ती' ऑडिओ क्लीप व्हायरल

Coronavirus : चिंताजनक! भारतातील 'ही' नऊ ठिकाणे ठरली कोरोनाचे हॉटस्पॉट, गाठली धोक्याची पातळी

Coronavirus : ...म्हणून 'त्या' जोडप्याने आपल्या मुलाचं नाव ठेवलं 'लॉकडाऊन'

 

 

Web Title: shiv bhojan thali started in jawhar palghar SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.