त्या रिक्षांविरोधात शिव वाहतूक सेनेचा चक्काजाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 03:13 AM2018-03-14T03:13:55+5:302018-03-14T03:13:55+5:30
शहरातील बेकायदा रिक्षांवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी शिव वाहतूक सेनेच्यावतीने विरारमध्ये चक्का जाम आंदोलन करण्यात आले. यावेळी तीन तास रिक्षा वाहतूक ठप्प झाली होती.
वसई : या शहरातील बेकायदा रिक्षांवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी शिव वाहतूक सेनेच्यावतीने विरारमध्ये चक्का जाम आंदोलन करण्यात आले. यावेळी तीन तास रिक्षा वाहतूक ठप्प झाली होती.
या परिसरात बेकायदा रिक्शा वाहतूक जोरात सुरु आहे. त्याचबरोबर कालबाह्य रिक्षा, विना परवाना, विना लायसन्स, विना बॅज रिक्शा चालवणाºयांचे प्रमाण वाढले आहे. त्याचा फटका प्रामाणिकपणे व्यवसाय करणाºया रिक्षा चालकांना बसतो आहे.
हे रिक्षाचालक प्रवाशांशीही गैरवर्तन करीत असतात. यावर शिव वाहतूक सेनेचे जिल्हा अध्यक्ष विनायक निकम आणि शिवसेनेचे जिल्हाउपप्रमुख दिलीप पिंपळे यांनी आवाज उठवून विरार शहरात हे चक्का जाम केले.
चंदनसार येथे झालेल्या आंदोलनामुळे विरार पूर्वेकडील रिक्षा वाहतूक तीन तास ठप्प झाली होती. कालबाह्य आणि अ़नधिकृत रिक्षा जप्त करून भंगारात मोडीत काढण्यात याव्यात. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पोलीस तैनात करण्यात यावेत. दर तीन महिन्यांनी वाहतूक पोलिसाची नाक्यावरून बदली करण्यात यावी. स्टँडवरील बेकायदा रिक्षा कायम बंद करण्यासाठी दर आठवड्याला भरारी पथकाद्वारे तपासणी केली जावी, अशाही मागण्या मोर्चेकºयांनी केल्या आहेत.
यानंतर निकम आणि पिंपळे यांनी परिवहन अधिकारी अनिल पाटील यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी वाहतूक सेनेच्या मागण्या मान्य केल्यात. बेकायदा वाहतूकीविरोधात लगेचच कारवाई सुरु केली जाईल, अशी ग्वाहीही पाटील यांनी यावेळी दिली.