'आयटम चाहिए तुझे...?’ सेक्सची मागणी करणाऱ्या शिवसेना विभागप्रमुखाला महिलेनं चोपलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2022 13:33 IST2022-01-29T13:12:59+5:302022-01-29T13:33:59+5:30
सेक्ससाठी महिलांची मागणी करणाऱ्या शिवसेना पदाधिकाऱ्याला महिलेकडून भररस्त्यात चोप

'आयटम चाहिए तुझे...?’ सेक्सची मागणी करणाऱ्या शिवसेना विभागप्रमुखाला महिलेनं चोपलं
विरार: फोनवरून सेक्सची मागणी करणाऱ्या शिवसेना विभाग प्रमुखाला महिलेनं रिक्षातच चपलेनं मारल्याची घटना विरारमध्ये घडली आहे. 'आयटम चाहिए, तुझे?', असं म्हणत महिलेनं शिवसेना विभागप्रमुखाला चपलेनं चोप दिला. जितू खाडे असं विभागप्रमुखाचं नाव आहे. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
विरारमध्ये रिक्षा चालवणाऱ्या महिलेनं शिवसेनेचा विभागप्रमुख जितू खाडेला भररस्त्यात रिक्षामध्ये चोप दिला. खाडेनं फोन कॉलवरून सेक्ससाठी महिलांची मागणी केल्याचा आरोप महिलेनं केला. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सध्या आरोपी खाडे फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
फोन कॉलवरुन सेक्ससाठी महिलांची मागणी करणाऱ्या शिवसेना विभाग प्रमुखाला महिलेनं चोपलं https://t.co/CbvSFUBywhpic.twitter.com/VdIdXuY4WO
— Lokmat (@lokmat) January 29, 2022
गेल्या १८-१९ वर्षांपासून विरारमध्ये राहते. रिक्षा चालवून उदरनिर्वाह करते. मात्र असा प्रकार आतापर्यंत कधीच घडला नव्हता, असं रिक्षा पीडित महिलेनं सांगितलं. मी जितू खाडे ८-१० वर्षांपासून ओळखते. अचानक त्यानं मला ४-५ कॉल केले. माझ्याशी अतिशय घाणेरड्या भाषेत बोलला. या प्रकरणी पोलिसांनी कठोर कारवाई केला. माझ्यासोबत घडलेला प्रकार दुसऱ्या महिलांसोबत घडू नये, असं महिलेनं सांगितलं.