शिवसेना-भाजपामध्ये एसटीसेवेवरून जुंपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 02:21 AM2018-06-08T02:21:03+5:302018-06-08T02:21:03+5:30

वसई तालुक्यात मनपाची परिवहन सेवा सुरू झाल्यानंतर २०१७ मध्ये अनेक मार्गवरील एसटी सेवा बंद झाली होती. त्यासाठी प्रवासी व नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलने केलीत.

 Shiv Sena-BJP stuck on STSV service | शिवसेना-भाजपामध्ये एसटीसेवेवरून जुंपली

शिवसेना-भाजपामध्ये एसटीसेवेवरून जुंपली

Next

विरार : वसई तालुक्यात मनपाची परिवहन सेवा सुरू झाल्यानंतर २०१७ मध्ये अनेक मार्गवरील एसटी सेवा बंद झाली होती. त्यासाठी प्रवासी व नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलने केलीत. त्याची दाखल घेत एसटी सेवा पुन्हा सुरु होण्याचे संकेत मिळाले असल्याने या सुरु होणाऱ्या एसटी सेवेचे श्रेय लाटण्यासाठी सेना भाजपा मध्ये चांगलीच जुंपली आहे.
वसईत १९६० मध्ये एसटी सेवा सुरू झाली होती. शहरात तत्कालीन वेळेस मनपाने परिवहन सेवा सुरु केल्याने २०१७ मध्ये अनेक मार्गांवरील बस सेवा तोट्यामुळे हळूहळू बंद करण्यात आली. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवासी हवालदिल झाले. वसई पश्चिमेकडील शेतकरी, चाकरमान्यांना एसटीसेवेचा आधार होता. भाजीपाला आणि अन्य सामान एसटी बसमधूनच पोहोचवले जात होते. एसटी सेवा रात्रीही सुरू असल्याने प्रवाशांची सोय होत होती. परंतु या अनेक मार्गांवरील एसटी सेवा बंद झाल्यामुळे प्रवाशांना फटका बसला.
एसटी सेवा सुरू करण्याच्या मागणीसाठी आंदोलन झाली.या जनआंदोलन समितीने पुढाकार घेतला.विवेक पंडित, मिलिंद खानोलकर, विनायक निकम, डॉमनिका डाबरे, प्रफुल्ल ठाकूर आदी नेत्यांसह अनेक संघटनांचे कार्यकर्ते, नागरिक रस्त्यांवर उतरले. सरकारने मात्र नागरिकांच्या मागणीची आणि आंदोलनांची दखल घेतली नाही. ‘शिवसेनेकडे जाण्यापेक्षा आमच्याकडे यायचे होते ; एसटी सुरू झाली असती’ असे वक्तव्य मुख्यमंत्रांनी पालघर लोकसभा पोटनिवडणूकीच्या प्रचारादरम्यान केले होते.
शिवसेनेच्या परिवहनमंत्र्यांनी एसटी सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे एसटी सेवा सुरू होईल, अशी आशा नागरिकांना वाटते आहे. पोटनिवडणूकीच्या काळात एसटी सेवेसाठी आंदोलनात पुढाकार घेणाºयापैकी काही कार्यकर्ते शिवसेनेत आणि काही जण भाजपमध्ये दाखल झाले. त्यामुळे आता एसटी सेवा सुरू करण्यावरून श्रेयवाद सुरू झाला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वसईत एसटी सेवा सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यासाठी माजी आमदार विवेक पंडित यांनी पाठपुरावा केला. कार्यकर्त्यांनी लढा दिला. त्यामुळे वसईत लवकरच एसटी सुरू होईल .
- प्रफुल्ल ठाकूर, जनआंदोलन समिती

एसटी सेवेसाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची भेट घेतली.त्यांनी वसईत लवकरच एसटी सुरू होईल असे सांगितले. परिवहन व्यवस्था करणे सरकारचे कर्तव्य आहे. त्यात श्रेयाची लढाई नको.
- मिलिंद खानोलकर, कार्यकर्ते

Web Title:  Shiv Sena-BJP stuck on STSV service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.