वाढवण बंदराबाबत शिवसेना दुतोंडी

By admin | Published: August 11, 2015 11:42 PM2015-08-11T23:42:06+5:302015-08-11T23:42:06+5:30

डहाणू तालुक्यातील वाढवण बंदराला शिवसेनेचा पूर्णपणे ठाम विरोध असल्याचे सेनेचे संपर्क प्रमुख अनंत तरे यांनी जाहीर केले असताना पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी वाढवण बंदर होणारच

Shiv Sena Dotandi | वाढवण बंदराबाबत शिवसेना दुतोंडी

वाढवण बंदराबाबत शिवसेना दुतोंडी

Next

पालघर : डहाणू तालुक्यातील वाढवण बंदराला शिवसेनेचा पूर्णपणे ठाम विरोध असल्याचे सेनेचे संपर्क प्रमुख अनंत तरे यांनी जाहीर केले असताना पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी वाढवण बंदर होणारच असे ठाम मत व्यक्त केले आहे. शिवसेनेच्या दुटप्पी धोरणाबाबत डहाणू, पालघर तालुक्यातील किनारपट्टीवर राहणाऱ्या मच्छीमार, शेतकरीवर्गासह तरूणवर्गामधून सोशल मिडीयावरून प्रचंड रोष व्यक्त केला जात आहे. तरूणांनी व्हाट्सअप, फेसबुक वर सेनेच्या दुटप्पी धोरणावर सडकून टीका करीत वाढवण बंदरासाठी पहिल्या टप्प्याच्या सर्व्हेक्षणाला मोठ्या प्रमाणात विरोध करणार असल्याचे वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष नारायण पाटील यांनी लोकमतला सांगितले.
डहाणू तालुक्यातील नियोजित वाढवण बंदराचा सर्वाधिक फटका मच्छीमार समाजासह बागायतीक्षेत्राला बसणार आहे. ओएनजीसीने समुद्रात तेलविहीरी निर्माण केल्याने मासेमारी क्षेत्रात घट निर्माण झाली आहे. त्यातच या बंदराच्या उभारणीमुळे मालवाहू जहाजाच्या वर्दळीचा मोठा विपरीत परिणाम मासेमारी व्यवस्थापनावर होऊन प्रदूषणाद्वारे मत्स्यबीज नष्ट होणार आहे. तसेच शेवंड, दाढा, घोळ, कोत इ. आर्थिक उत्पन्न देणाऱ्या माशाच्या पिल्लांचे संवर्धन इथे मोठ्या प्रमाणात होत असल्याने भाग माशांचा गोल्डन बेल्ट म्हणून सर्वत्र ओळखला जातो. तसेच प्रभु श्रीरामचंद्राने आपल्या वडीलांचे पिंडदान केल्याने या ऐतिहासिक स्थळाचे पावित्र नष्ट होणार असल्याने लोकांच्या धार्मीक भावना दुखावल्या आहेत.
पालघर येथे ठाणे जिल्हा मच्छीमार मध्यवर्ती संघाने २४ जून २०१५ रोजी पालघर येथे वाढवण बंदराला विरोध करण्यासाठी आयोजित केलेल्या मच्छीमारांच्या बैठकीमध्ये पालघर जिल्हा शिवसेनेचे संपर्क प्रमुख अनंत तरे यांनी येऊन सेना कार्याध्यक्ष उध्वव ठाकरे यांचा हवाला देऊन वाढवण बंदराला सेनेचा पूर्णपणे विरोध राहील असे घोषित केले होते. ही घोषणा विरते न विरते तोच सेनेचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी विधानपरिषदेत वाढवण बंदर होणारच असे घोषित करून संपर्क प्रमुखांच्या घोषणेला किंमत नसल्याचे सिद्ध केले.
पालघर विधानसभेची पोट निवडणूक लवकरच जाहीर होणार असल्याने मताच्या गठड्यावर डोळा ठेवून संपर्क प्रमुख अनंत तरे यांनी मच्छीमारांची सहानुभूती मिळावी यासाठी ही घोषणा केल्याचे सत्य सर्वांसमोर उघडे झाले आहे. ज्या वाढवण बंदराला १९९८ मध्ये उद्धव ठाकरे, आनंद दिघे या सेनेच्या ज्येष्ठ नेत्यांनी भेट देत विरोध केला होता. तसेच ज्या पवित्र ऐतिहासिक स्थळावर सेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अस्थिंचे विसर्जन करण्यात आले ते पवित्र स्थळ उध्वस्त करण्याला शिवसेनेचा पाठींबा असल्याने अनेक वर्षापासून शिवसेनेची भिंत अभेद्य ठेवणारा कडवट शिवसैनिकही खवळला आहे. (वार्ताहर)

Web Title: Shiv Sena Dotandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.