जाहिरात फलकांची तक्रार करणाऱ्याचेच शिवसेनेच्या नावे बनावट जाहिरात फलक लावले; मीरारोडमधील खळबळजनक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2022 07:46 PM2022-02-11T19:46:01+5:302022-02-11T22:01:11+5:30

महापालिका व पोलिसांनी केले २ गुन्हे दाखल. माहिती अधिकार कार्यकर्त्याच्या नाव छायाचित्राचा वापर करून शिवसेनेचे बनावट जाहिरात फलक लावण्यात आला .  

Shiv Sena erected billboards who complained about billboards in Miraroad | जाहिरात फलकांची तक्रार करणाऱ्याचेच शिवसेनेच्या नावे बनावट जाहिरात फलक लावले; मीरारोडमधील खळबळजनक प्रकार

जाहिरात फलकांची तक्रार करणाऱ्याचेच शिवसेनेच्या नावे बनावट जाहिरात फलक लावले; मीरारोडमधील खळबळजनक प्रकार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड - मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशांची अमलबजावणी करा व शहर जाहिरात फलक मुक्त राहावे ह्यासाठी गेल्या  अनेक वर्षां पासून तक्रारी करणाऱ्या माहिती अधिकार कार्यकर्त्याच्या नाव छायाचित्राचा वापर करून शिवसेनेचे बनावट जाहिरात फलक लावण्यात आला . महापालिकेने आश्चर्यकारक तत्परता दाखवून मीरारोड व नया नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावर पोलिसांनी ताबडतोब गुन्हा दाखल केला आहे . ह्या मागचे कट कारस्थानी राजकीय असल्याने ते शोधून काढा व असे खोटे प्रकार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा अशी मागणी होत आहे . 

बेकायदा जाहिरात फलक , कमानी लावणाऱ्यां विरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने अनेक वेळा  दिले आहेत .  असताना मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रात मात्र राजरोसपणे झाडांवर , सिग्नल , वाहतूक बेट , पथदिवे, रस्ते - पदपथ  आदी सार्वजनिक ठिकाणी सर्रास बेकायदा जाहिरात फलक व कमानी उभारल्या जातात . ह्यात वाहतूक व रहदारीला अडथळा , झाडांचे नुकसान ,  आर्थिक नुकसान व शहराचे विद्रुपीकरण होत असल्याने माहिती अधिकार कार्यकर्ते कृष्णा गुप्ता  गेल्या अनेक वर्षां पासून महापालिका व पोलीस  तक्रारी करत आहेत . त्यांच्या पाठपुराव्या मुळे अनेक गुन्हे दाखल झाले आहेत . महत्वाचे म्हणजे महासभेने देखील बेकायदा जाहिरात फलक विरुद्ध ठराव केला आहे . तर प्रशासन व लोकप्रतिनिधी ह्यांनीच एकेकाळी बॅनर - बोर्ड विरुद्ध मोहीम राबवली होती . 

पण बॅनर विरुद्ध मोहीम राबवणारे आणि महासभेत ठराव करणारेच अनेकजण बेकायदा जाहिरात फलक लावत आहेत . सप्टेंबर महिन्यातील तक्रारी वरून पोलीस टाळाटाळ करत असताना गुप्ता यांच्या पाठपुराव्या मुळे पालिका प्रभाग अधिकारी कांचन गायकवाड यांनी फिर्याद दिल्याने नवघर पोलिसांनी  उपमहापौर हसमुख गेहलोत व माजी महापौर डिंपल मेहता यांच्या विरुद्ध ८ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल केला . शिवाय गुप्ता यांच्या पाठपुराव्या मुळे माजी आमदार मेहतांवर कोरोना नियमांचे उल्लंघन केले म्हणून गायकवाड यांच्या फिर्यादी वरून गुन्हा दाखल झाला . 

तोच ९ फेब्रुवारी रोजी नरेंद्र मेहता समर्थक मानले जाणारे भाजपाचे कार्यकर्ते संजय साळवी व एसपी मौर्या यांनी प्रभाग कार्यालया कडे तक्रारी केल्या . गुप्ता ह्यांचे छायाचित्र व नाव  असलेले शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे जाहिरात फलक कनकिया येथील पोलीस उपायुक्त कार्यालय व पय्याडे हॉटेल लगतच्या रस्त्यावर लागले असल्याने कारवाईची मागणी साळवी व मौर्या यांनी केली . 

गुरुवारी तर एका नेत्याने पालिका उपायुक्त मारुती गायकवाड व प्रभाग अधिकारी कांचन ह्यांना बॅनर प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी चालवली असल्याची चर्चा आहे . तर एरव्ही सामान्य नागरिकांनी तक्रारी करून देखील अनेक महिने व वर्ष कारवाई न करणाऱ्या पालिका अधिकारी कांचन ह्यांनी नया नगर व मीरारोड पोलीस ठाण्यात जाऊन गुप्ता यांच्या लागलेल्या जाहिरात फलक प्रकरणी जाहिरातदार व अनोळखी व्यक्ती विरुद्ध फिर्याद दिली . पोलिसांनी देखील त्वरित फिर्याद घेऊन गुन्हा दाखल केला आहे.  

दरम्यान गुप्ता यांनी पोलीस व पालिका आयुक्तांना लेखी तक्रार केली आहे . आपण बेकायदा बॅनर विरुद्ध इतकी वर्षे तक्रारी करत असताना तसेच शिवसेनेचे कार्यकर्ते नसताना कटकारस्थान करून आपला खोटा बॅनर बनवून लावले गेले व मेहता समर्थक कार्यकर्त्यांनी  जाणीवपूर्वक तक्रारी केल्या. ह्यातील सूत्रधार व सहभागी लोकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी गुप्ता यांनी केली आहे . 

Web Title: Shiv Sena erected billboards who complained about billboards in Miraroad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.