वाडा येथे शिवसेनेने दिले ३०० रोजगार
By admin | Published: July 29, 2016 02:50 AM2016-07-29T02:50:33+5:302016-07-29T02:50:33+5:30
शिवसेनेचे प्रक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वाडा तालुका शिवसेना शाखा व मातोश्री सेवा संस्थेच्या वतीने तालुक्यातील बेरोजगारांसाठी आयोजिलेल्या
वाडा : शिवसेनेचे प्रक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वाडा तालुका शिवसेना शाखा व मातोश्री सेवा संस्थेच्या वतीने तालुक्यातील बेरोजगारांसाठी आयोजिलेल्या रोजगारार मेळाव्यात सहभागी झालेल्या ६०० युवकांपैकी ३०० जणांना रोजगार प्राप्त झाला. उर्वरितांना लवकरच तो उपलब्ध होईल, असे आयोजकांनी सांगितले आहे.
युवक युवतींसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन वाडयातील पी. जे. हायस्कूलच्या सभागृहात बुधवार दि.२७ रोजी सायंकाळच्या सुमारास करण्यात आले होते. यावेळी ज्या ज्या ग्रामपंचायतींवर शिवसेनेचे सरपंच उपसरपंचपदी निवडुन आले आहेत त्यांचा पक्षाच्या वतीने अध्यक्षांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
अॅमेझोन, फ्लिपकार्ट आदी कंपन्यामध्ये नोकऱ्यांची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे असे तालुकाप्रमुख प्रकाश पाटील यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमास आमदार शांताराम मोरे, ज्येष्ठ नेते उदयबंधु पाटील, पालघर जिल्हा प्रमुख उत्तम पिंपळे, महिला आघाडीच्या प्रमुख ज्योती ठाकरे, भिवंडी ग्रामीण विधानसभा संपर्क संघटक गिरीष पाटील, वाहतुक सेनेचे जिल्हा संघटक सुनिल शिंदे, आश्रय चॅरीटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष रवि निमले, जि.प. पालघरचे गटनेते निलेश गंधे, तालुका प्रमुख प्रकाश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यापुढे ही अशा प्रकारचे मेळावे आयोजित केले जातील अशी माहिती आयोजकांनी दिली.
(वार्ताहर)