Rajyasabha Election: हितेंद्र ठाकूरांच्या विधानानं महाविकास आघाडीसह भाजपाचही वाढलं टेन्शन; राज्यसभेच्या निवडणुकीची वाढली चुरस

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2022 08:31 AM2022-06-06T08:31:03+5:302022-06-06T08:31:59+5:30

शिवसेनेचे नेते आणि बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर यांच्यात जवळपास ४ तास बंद दाराआड चर्चा झाली. 

Shiv Sena leader and Bahujan Vikas Aghadi MLA Hitendra Thakur had a closed door discussion for about 4 hours. | Rajyasabha Election: हितेंद्र ठाकूरांच्या विधानानं महाविकास आघाडीसह भाजपाचही वाढलं टेन्शन; राज्यसभेच्या निवडणुकीची वाढली चुरस

Rajyasabha Election: हितेंद्र ठाकूरांच्या विधानानं महाविकास आघाडीसह भाजपाचही वाढलं टेन्शन; राज्यसभेच्या निवडणुकीची वाढली चुरस

googlenewsNext

वसई/मुंबई-  राज्यसभा निवडणुकीच्या सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात उतरल्याने चुरस वाढली आहे. या निवडणुकीत भाजपाचे दोन आणि काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून येणार हे निश्चित आहे. तर भाजपाचा तिसरा आणि शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवारामध्ये सहाव्या जागेसाठी चुरस आहे. निवडून येण्यासाठी आवश्यक असलेला ४२ मतांचा कोटा दोन्ही उमेदवारांकडे नसल्याने छोटे पक्ष अपक्षांवर त्यांची मदार आहे.

राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे राज्यसभेचे उमेदवार धनंजय महाडिक यांनी रविवारी सकाळी बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा आमदार हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली. त्यानंतर शिवसेनेचे नेते सुनील राऊत, खासदार राजन विचारे यांनी देखील हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली. शिवसेनेचे नेते आणि हितेंद्र ठाकूर यांच्यात जवळपास ४ तास बंद दाराआड चर्चा झाली. 

सदर बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, कोणता निर्णय झाला, याबाबत मात्र बोलणे टाळलं आहे. मात्र हितेंद्र ठाकूर यांनी मोजकचं भाष्य करत महाविकास आघाडीसह भाजपाचही टेन्शन वाढवलं आहे. आपण आपली भूमिका राज्यसभेच्या मतदानाच्यादिवशीच ठरवू, असं हितेंद्र ठाकूर यांनी म्हटलं आहे. 

महाराष्ट्राच्या राजकारणात तब्बल १८ वर्षानंतर राज्यसभेची निवडणूक होत आहे. निवडणूक टाळण्यासाठी महाविकास आघाडीकडून प्रयत्न करण्यात आलं. पण त्यांना अपयश आले. आता निवडणूक होणार यावर शिक्कामोर्तब झाला आहे. या निवडणूकीत कोणताही दगा फटका होऊ नये, त्यामुळे महाविकास आघाडीने सर्व आमदारांना एकत्र हॉटेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे

दरम्यान, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडे मिळून २६ अतिरिक्त मतं आहेत. मात्र उर्वरित १६ मतांसाठी त्यांना महाविकास आघाडीला पाठिंबा देणारे अपक्ष, छोटे पक्ष आणि इतरांच्या पाठिंब्याची गरज आहे. तर भाजपाकडे स्वत:ची २२ अतिरिक्त मतं असून, अन्य ७ आमदारांचा पाठिंबा धरता एकूण २९ मते आहेत. उर्वरित १३ मतांसाठी भाजपाचा महाविकास आघाडीचे मित्र असलेले छोटे पक्ष आणि अपक्षांवर डोळा आहे. 

Web Title: Shiv Sena leader and Bahujan Vikas Aghadi MLA Hitendra Thakur had a closed door discussion for about 4 hours.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.