शिवनेरी ढाबा ते कासटवाडी रस्ता धोक्याचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 02:25 AM2018-04-26T02:25:32+5:302018-04-26T02:25:32+5:30
रस्त्याच्या दोन्ही बाजूने वळणावर दुतर्फा झाडे, झुडपे वाढली आहेत.
जव्हार : जव्हारहुन वाडा व मनोर हायवे पालघर कडे जातांना शिवनेरी धाबा ते कासटवाडीपर्यंत फक्त ३ कि.मी.अंतर वाहन चालकांना जीव धोक्यात टाकून वाहन चालवाले लागत असून, वाहन चालकांना धोक्याची घंटा आहे. तेही हे अपघात शिवनेरी धाबा ते कासटवाडीपर्यंत फक्त ३ कि.मी. अंतरावर असे अनेक अपघात वारंवार घडत आहेत. त्यामुळे या महिनाभरात दोन युवकांचा बळी गेला आहे. तर १० जण गंभीररित्या जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने गंभीररित्या लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
रस्त्याच्या दोन्ही बाजूने वळणावर दुतर्फा झाडे, झुडपे वाढली आहेत. त्यामुळे समोरून येणारे वाहने सहजासहजी दिसत नाही. रस्ता चांगला असल्याने वाहने देखील वेगाने येतात. वळनावरील वाढलेल्या झुडपांमुळे समोरून येणारे वाहन दिसत नसल्यामुळे अनेक लहान मोठे अपघात सतत घडत आहेत.
जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागाकडे याबाबत चौकशी केली असता, रस्त्याच्या साईट पट्टीची झाडे, झुडपे कटिंग करायला जव्हार वनविभाग परवानगी देत नसल्याचे बांधकाम अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच रस्त्याच्या बाजूला साईड पट्टीचे कामही व्यविस्थत नसल्यामुळे अपघात सतत घडत आहेत. यामुळे बांधकाम विभागाने लक्ष देण्याची गरज आहे. अपघाता आकडा वाढल्याने तेथे बोर्ड लावण्याची मागणी होत आहे.
रस्त्याच्या साईट पट्टीची झाडे झुडपे तोडायला वनविभाग परवानगी देत नाहीत. त्यामुळे आम्हला अडचण आहे.
- डी.जी.होले. उपविभागीय अधिकारी, सा.बांधकाम जव्हार.
रस्त्याच्या साईटची लहान झुडपे कापायची आहेत. त्यामुळे बांधकाम विभागाने पत्र देवून झाडे, झुडपांची किटंग करावी. आमची काहीच अडचण नाही. - कुलदीप पातकर, वनपरिक्षेत्र अधिकारी