शिवसेनेकडून महापालिकेवर आरोप : सत्यशोधन समितीचे ‘विसर्जन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 02:35 AM2018-09-25T02:35:42+5:302018-09-25T02:36:06+5:30

वसई-विरार महानगरपालिकेच्या सत्यशोधन समिती बनावट असल्याची ओरड शिवसेना करीत असताना रविवारी या सत्यशोधन समितीचे व अनिधकृत पुलाचे प्रतिकात्मक विसर्जन राजावली खाडीमध्ये शिवसैनिकांनी केले.

 Shivsena charges allegations against BMC | शिवसेनेकडून महापालिकेवर आरोप : सत्यशोधन समितीचे ‘विसर्जन’

शिवसेनेकडून महापालिकेवर आरोप : सत्यशोधन समितीचे ‘विसर्जन’

googlenewsNext

नालासोपारा - वसई-विरार महानगरपालिकेच्या सत्यशोधन समिती बनावट असल्याची ओरड शिवसेना करीत असताना रविवारी या सत्यशोधन समितीचे व अनिधकृत पुलाचे प्रतिकात्मक विसर्जन राजावली खाडीमध्ये शिवसैनिकांनी केले.
या समितीच्या माध्यमातून वसईत ज्या ९ जनासुनावण्या झाल्या त्या सभेला जनतेने सपशेल पाठ फिरवली होती. अशा बनावट सत्यशोधन समितीचे त्याच राजावली खाडीमध्ये रविवारी शिवसेना नवघर माणिकपूर शहर शाखेतर्फे विसर्जन करण्यात आले. या पूरासाठी कारणीभूत ठरलेल्या तात्पुरत्या लोखंडी पुलाची प्रतिकृतीही प्रवाहात सोडण्यात आली. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख प्रवीण म्हाप्रळकर, विधानसभा संघटक विनायक निकम, गटनेत्या किरण चेंदवणकर, शहरप्रमुख राजाराम बाबर, उपशहरप्रमुख मिलिंद चव्हाण, सुधाकर रेडकर , सुभाष विश्वासराव, शैला हाटकर, प्रतिभा ठाकूर, शशिभूषण शर्मा, संजय गुरव हे उपस्थित होते.
महसूल व वनविभागाने बेकायदा बांधकामाकडे केलेले दुर्लक्ष पूरासाठी जबाबदार असल्याचा आरोप केला जात आहे. वसईतील पुर ओसरल्यानंतर महापौर रूपेश जाधव यांनी अनिधकृत बांधकामे फक्त महापालिका क्षेत्रातच झालेली नसून महसूल व वनविभागाच्याही जागेत झाल्याचे जाहिररित्या वक्तव्य केले होते. वसई औद्योगिक क्षेत्राचे १५० कोटीहून अधिक नुकसान झाल्याचेही त्यांनी त्यावेळी सांगीतले होते. दरम्यान, राजीवली खाडीमध्ये लोखंडी पुलासाठी टाकलेला माती भराव व सिमेंट पूरास कारणीभूत ठरला होता.

तहसीलदार, आयुक्त कुणाला झाकताय? राजावली येथील खाडीवर उभारण्यात आलेल्या पूलामुळे खाडीचे पात्र निमूळते होऊन पाणी वाहून जाण्यास जागाच उरली नव्हती. राजावली खाडीमध्ये भराव टाकून जो अनिधकृत पूल बांधला त्यामुळेच वसईमध्ये जुलै मिहन्यात पूर आला.

हा पूल कोणी बांधला ? याबाबत तहसीलदार व पालिका आयुक्त यांनी अजुनही मौन बाळगले आहे. त्यामुळे हे अधिकारी नेमके कोणाला वाचवू पाहत आहे ? असा सवाल शिवसेना उपशहरप्रमुख मिलिंद चव्हाण यांनी केला आहे.
 

Web Title:  Shivsena charges allegations against BMC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.