धक्कादायक! एकाच कुटुंबातील तिघांची रेल्वेखाली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2020 06:35 AM2020-12-20T06:35:37+5:302020-12-20T06:36:20+5:30

suicide : विरार पूर्वेकडील साईनाथनगरमध्ये पोपट धोंडीराम जंगम हे पत्नी नंदा, मुलगा सोमनाथ, मुलगी प्रमिला व नात समीक्षासह राहत होते.

Shocking! Three members of the same family commit suicide under the train | धक्कादायक! एकाच कुटुंबातील तिघांची रेल्वेखाली आत्महत्या

धक्कादायक! एकाच कुटुंबातील तिघांची रेल्वेखाली आत्महत्या

Next

नालासोपारा : विरारच्या साईनाथनगरमध्ये राहणाऱ्या एकाच कुटुंबातील तिघांनी शनिवारी पहाटे नालासोपारा ते वसईच्या दरम्यान रेल्वेखाली आत्महत्या केली. नंदा जंगम (५५), सोमनाथ (३१), प्रमिला (३५) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत, तर या वेळी १० वर्षांची समीक्षा गंभीर जखमी झाली आहे.
विरार पूर्वेकडील साईनाथनगरमध्ये पोपट धोंडीराम जंगम हे पत्नी नंदा, मुलगा सोमनाथ, मुलगी प्रमिला व नात समीक्षासह राहत होते. जंगम यांचे मसाला कुटण्याचे (डंक) दुकान असून, त्याच्यावरच उदरनिर्वाह व्हायचा. शनिवारी पहाटे पोपट यांना कुटुंबातील चौघांनी फिरायला जातो, असे सांगून ते घरातून बाहेर निघाले होते.
रेल्वे पोलिसांनी सात वाजण्याच्या सुमारास पोपट यांना फोन करून त्यांची पत्नी नंदा, मुलगा सोमनाथ व मुलगी प्रमिला यांचे मृतदेह रेल्वे रुळावर सापडल्याचे सांगितले. त्यांची १० वर्षांची  नात समीक्षा ही बेशुद्ध अवस्थेत सापडल्याने पोलिसांनी तिला रुग्णालयात दाखल केले.
रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतले. मिळालेल्या माहितीनुसार, जंगम कुटुंबातील सदस्याचा शुक्रवारी वाढदिवस साजरा करण्यात आला होता. गेल्या दोन-तीन दिवसांपासून धंदा होत नसल्याने गरिबीमुळे त्रासल्याने त्यांनी जीवनाचा अंत केल्याची चर्चा सुरू आहे. मालगाडीच्या मोटरमनने जंगम परिवारातील सदस्य रेल्वे रुळावर झोपले होते, असे सांगितले. या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Shocking! Three members of the same family commit suicide under the train

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.