दुकानातील मोबाइल दुसऱ्यांदा चोरीस

By Admin | Published: February 15, 2017 11:23 PM2017-02-15T23:23:39+5:302017-02-15T23:23:39+5:30

गेल्या वर्षी ज्या दुकानात ११ लाखांच्या मोबाईलची चोरी झाली त्याच दुकानात पुन्हा चोरी झाली असून यावेळी अज्ञात चोरांनी सुमारे ८ लाखांचे मोबाईल लुटून

Shop mobile a second time | दुकानातील मोबाइल दुसऱ्यांदा चोरीस

दुकानातील मोबाइल दुसऱ्यांदा चोरीस

googlenewsNext

विरार : गेल्या वर्षी ज्या दुकानात ११ लाखांच्या मोबाईलची चोरी झाली त्याच दुकानात पुन्हा चोरी झाली असून यावेळी अज्ञात चोरांनी सुमारे ८ लाखांचे मोबाईल लुटून नेले आहेत. सीसीटीव्हीत चोरीचा हा थरार चित्रित झाला आहे.
नालासोपारा पूर्वेकडील चंदन नाका येथे डी जी १ नावाचे मोठे शोरूम असून त्यात स्रेहांजली नावाचे मोबाईल दुकान आहे. ९ फेब्रुवारीला रात्री दुकान बंद करून मालक संदीप डबराल घरी गेले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी दुकानात कर्मचारी आले असता ही चोरी झाल्याचे लक्षात आले. रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरांनी दुकानाचे शटर तोडून विविध कंपन्यांचे सुमारे ८ लाख रुपये किंमतीचे मोबाईल चोरल्याचे लक्षात आले आहे. पोलिसांनी अज्ञात चोरांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करत आहे. पोलिसांनी दुकानात लावण्यात आलेले सीसीटीव्ही ताब्यात घेतले आहेत. विशेष म्हणजे मागील वर्षी याच दुकानात अज्ञात चोरांनी चोरी करून सुमारे ११ लाख रुपयांचे मोबाईल चोरी केले होते. त्यावेळी चोरटे सीसीटीव्हीचे डिव्हीआर घेऊन पळाले होते. आम्ही दुकानातील सीसीटीव्ही ताब्यात घेतले असून तपास सुरू केला आहे. एक चोर आत चोरी करत असून एक चोर बाहेर उभा असलेला सीसीटीव्ही मध्ये दिसत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश बिराजदार यांनी सांगितले. (वार्ताहर)

Web Title: Shop mobile a second time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.