चिमुरडीवर अत्याचारानंतर दुकानांची केली तोडफोड; भाईंदरमधील घटना; पोलिस ठाण्यात गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 10:24 AM2024-04-15T10:24:05+5:302024-04-15T10:24:38+5:30

७ एप्रिल रोजी ही संतापजनक घटना घडली होती.

Shops vandalized after child molested incident in Bhayandar Confusion at the police station | चिमुरडीवर अत्याचारानंतर दुकानांची केली तोडफोड; भाईंदरमधील घटना; पोलिस ठाण्यात गोंधळ

चिमुरडीवर अत्याचारानंतर दुकानांची केली तोडफोड; भाईंदरमधील घटना; पोलिस ठाण्यात गोंधळ

लोकमत न्यूज नेटवर्क, मीरा रोड : नवघर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका चार वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणास धार्मिक वळण लागून जमावाने रविवारी रात्री पोलिस ठाण्यात गोंधळ घालत परिसरातील काही दुकानांची तोडफोड केली. शहरात तणावाचे वातावरण असून, मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
 
मीरा रोड भागातील एका दुकानदाराने साडेतीन ते चार वर्षांची चिमुरडी खेळण्यासाठी आली असता, तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. ७ एप्रिल रोजी ही संतापजनक घटना घडली होती. हा प्रकार रविवारी समोर आल्यानंतर दुकानाची तोडफोड करून दुकानचालकास जमावाने मारहाण करत नवघर पोलिस ठाण्यात आणले. आमदार गीता जैन, भाजपचे स्थानिक नेते ॲड. रवी व्यास आदी पोलिस ठाण्यात दाखल झाले. 

आराेपीला अटक, कारवाईचे आश्वासन
- पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली; परंतु रात्री उशिरापर्यंत जमाव पोलिस ठाण्यात व परिसरात घोषणा देत होता व आरोपीला आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी करत होता. आ. प्रताप सरनाईक, पोलिस उपायुक्त प्रकाश गायकवाड हे पोलिस ठाण्यात जमावाला शांत राहण्याचे आवाहन करत होते. 
- आरोपीला अटक केल्याचे सांगत कठोर कारवाईचे आश्वासन देऊनही जमाव ऐकत नव्हता. काही जणांनी चार ते पाच दुकानांची तोडफोड केली. त्यामुळे पोलिसांनी सौम्य लाठीमार करत जमावाला पांगविले.

याप्रकरणी तत्काळ गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करा, अशी मागणी आ. जैन व व्यास यांनी केली. 

Web Title: Shops vandalized after child molested incident in Bhayandar Confusion at the police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.