वसई-विरार महापालिका मुख्यालयाच्या चौथ्या मजल्यावर शॉर्टसर्किट; मोठा अनर्थ टळला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2022 03:24 PM2022-03-08T15:24:23+5:302022-03-08T15:25:23+5:30

सभागृहात अधिकारी कर्मचारी वर्गाची बैठक सुरु असताना घडला प्रकार; सर्व काही सुरळीत

short circuit on the fourth floor of Vasai Virar Municipal Corporation headquarters but calamity was averted | वसई-विरार महापालिका मुख्यालयाच्या चौथ्या मजल्यावर शॉर्टसर्किट; मोठा अनर्थ टळला

वसई-विरार महापालिका मुख्यालयाच्या चौथ्या मजल्यावर शॉर्टसर्किट; मोठा अनर्थ टळला

Next

आशिष राणे, लोकमत न्यूज नेटवर्क

वसई: वसई विरार शहरात आग लागण्याच्या घटना काही थांबायचे नाव घेत नाही किंबहुना आता आगीच्या घटना या वसई विरार महापालिका मुख्यालयात देखील घडताना दिसत आहेत. वसई विरार महानगरपालिकेच्या विरार मुख्यालयातील चौथ्या मजल्यावरील गोडाऊन वजा इलेटक्ट्रिक केबिनमध्ये अचानकपणे शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याची घटना मंगळवारी दुपारी १ च्या सुमारास घडली. भर सभागृहात ही बातमी समजल्यावर काही वेळ एकच गोंधळ उडाला होता मात्र प्रसंगावधान राखल्याने मोठा अनर्थ टळला आहे

ही आग लागताच त्यावर उपस्थित कर्मचाऱ्यांनी आग नियंत्रण सहित्य फवारणी करून ही आग तात्काळ विझविल्याने पुढील मोठा अनर्थ टळला असल्याचे उपस्थित नगररचना कर्मचारी वर्गाने लोकमतला सांगितले. याप्रसंगी सभागृहात पालिका प्रशासनाच्या वतीने नगररचना विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती मात्र १ एप्रिलपासून  बांधकाम परवानगी ऑनलाइन करणे बाबतीतली एक महत्त्वाची बैठक व प्रात्यक्षिक देखील याठिकाणी सुरू होते. आग लागल्याचे समजताच तात्काळ येथील सभागृहात उपस्थित अधिकारी व कर्मचारी वर्गास सुरक्षितता म्हणून पालिका मुख्यालयाबाहेर  हलवण्यात आले.

ही आग केवळ थोडेसे शॉर्टसर्किट होते तर त्यात काहीही नुकसान झालेल नाही. उपस्थित कर्मचाऱ्यांनी तात्काळ आग नियंत्रण साहित्य फवारणी केल्याने सर्व काही सुरक्षित राहिले अर्थात पालिकेने आम्हाला माहितीसाठी या घटनेची वर्दी दुपारी दिली असल्याचे मुख्य अग्निशमन दलाचे प्रमुख दिलीप पालव यांनी लोकमतला सांगितले. विशेष म्हणजे  यापूर्वी देखील सहा ते आठ महिन्यापूर्वी नगररचना विभागात शॉर्टसर्किट ची अशीच एक घटना घडली होती तर ही घटना दुसरी पुनरावृत्ती असल्याचे सांगत अशा घटनांना वेळीच आळा घातला पाहिजे
 

Web Title: short circuit on the fourth floor of Vasai Virar Municipal Corporation headquarters but calamity was averted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.