ईद-ए-मिलादनिमित्त सर्वत्र जल्लोष; शेकडो अरबी परीक्षार्थींना प्रोत्साहनपर पारितोषिके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2017 02:12 AM2017-12-03T02:12:09+5:302017-12-03T02:12:19+5:30
मुस्लिम धमार्चे प्रेषित हजरत मोहंमद पैगंबर (स.ऐ.व.) यांच्या जयंती निमीत्त जव्हार शहरातील सुन्नी मुस्लिम बांधवांनी आपल्या बाळ-गोपांळांना नविन कपडे, कुर्ता-पायजामा घालुन पारंपारीक पोशाखात भव्य मिरवणूक काढून ईद-ए-मिलादुन नबी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
- हुसेन मेमन
जव्हार : मुस्लिम धमार्चे प्रेषित हजरत मोहंमद पैगंबर (स.ऐ.व.) यांच्या जयंती निमीत्त जव्हार शहरातील सुन्नी मुस्लिम बांधवांनी आपल्या बाळ-गोपांळांना नविन कपडे, कुर्ता-पायजामा घालुन पारंपारीक पोशाखात भव्य मिरवणूक काढून ईद-ए-मिलादुन नबी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जामा मस्जिदीच्या आवारात, एस. टी. स्टॅण्ड येथून रिझवी मोहल्ला येथे यंदा सर्व मिरवणूकतील बाळ गोपाळांना शिरणी (गोड पदार्थ) वाटण्यात आले.
जव्हार शहरात ईद-ए-मिलादुन नबी बाळ-गोपाळांसह तरूण साजरा करतात. ईदे मिलाद साजरा करण्याकरीता महिन्या भरा पासुन तरूण वगार्ची तयारी सुरू असते. दर्गाह आळी चौक, रिझवी चौक, एस. टी. स्टॅन्ड या ठिकाणी व आप आपल्या मोहल्ल्यामध्ये पताके, चमकदार लडी, पुर्ण मोह लाईटींगने सजवून, झेंडे, घराघरात बिल्डींगवर भव्य रोषनाई करण्यात आलेली आहे.
या दिवशी जुलूस (मिरवणूक) जामा मस्जिदी पासून पाचबत्ती नाका, एस.टी. स्ॅटण्ड वरून रझवी मोहल्ला, गांधीचौकातून जामा मस्जिदी पर्यत काढण्यात आला. यावेळी हजारोंच्या संख्येने अबाल वृद्धांनी मिरवणूकीमध्ये सहभाग घेतला. यावेळी वेगवेगळ्या समित्यांकडून शरबत, समोसे, बिस्कीट, चॉकलेट, शरबत, नानखटाई, बुंदी, लहान मुला-मुलींकरीता आईस्क्रिम तसेच जव्हार मेमन जमाती मार्फत वडापावचे वाटप करण्यात आले. दर्गाह आळी येथे मिरवणुकीचे समापन झाले. तेथे लहान मुला-मुलींचे अरबी मधून परीक्षा घेऊन तब्बल ५५० लहानग्याना विविध प्रकारचे प्रोत्साहनपर परितोषिकांचे वाटप करण्यात आले.
यावेळी सुन्नी जामा मस्जिदचे ट्रस्ट बोडार्चे पदाधिकारी सै. खलील कोतवाल, नासीर शेख, रहीम लुलानिया, तंजीम पिरजादा, रियाज मनियार, अर्शद कोतवाल, सै. शकिल कुनमाळी, नदिम चाबुकस्वार, नासीर मेमन, माजी अध्यक्ष सैय्यद जैनुलआबेदीन पिरजादा, जब्बार मेमन, बबला शेख, जावेद पठाण, तसेच मेमन जमातचे अध्यक्ष हाजी हुसेन मेमन, उपाध्यक्ष जुनेद मेमन व शब्बीर मेमन, सेक्रटरी अवेश मिन्नी, हाजी ईमतियाज, हाजी जुनेद, हाजी ईमरान, मुस्ताक बल्लू, आसीफ मेमन तसेच मदरसा अनवारे रजाचे हाजी सरफराज मेमन, वसीम शेख, मौलाना हैदर अली, असगर अली आदींनी परीक्षार्र्थींच्या निकालाचे नियोजन केले. यात बाळ-गोपाळांसह पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. बक्षीस वितरणानंतर रिझवी मोहल्ल्यातील तरूणांनी लंगरचे नियोजने केले होते.