चार शिक्षकांसह अन्य ६ जणांना कारणे दाखवा नोटीस
By Admin | Published: September 29, 2016 03:27 AM2016-09-29T03:27:13+5:302016-09-29T03:27:13+5:30
डहाणू तालुक्यातील पाच शाळा आणि पाच अंगणवाडी केंद्राला बुधवारी पालघर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांनी अचानक भेटी दिल्या नंतर अनेक
- हितेन नाईक, पालघर
डहाणू तालुक्यातील पाच शाळा आणि पाच अंगणवाडी केंद्राला बुधवारी पालघर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांनी अचानक भेटी दिल्या नंतर अनेक शाळा मध्ये शिक्षक उशिराने येत असल्याचे आणि दोन अंगणवाड्या चक्क बंद असल्याचे त्यांना आढळून आल्या.याची गंभीर दखल त्यांनी घेतली असून ४ शिक्षका सह अन्य ६ जणांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
पालघर जिल्ह्यातील अनेक शाळा मधील काही शिक्षक विशेष प्रोत्साहन भत्त्याच्या फायद्यासाठी पालघर, बोईसर, सफाळे इ. शहरा जवळील शाळा बळकावीत असून शाळांवर उशिराने ये जा करीत असल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत असल्याच्या तक्र ारी पुढे येत होत्या. त्या अनुषंगाने तक्र ारीतील तथ्यता तपासण्यासाठी काल स्वत: निधी चौधरी यांनी डहाणू तालुक्यातील जामशेत (कामडी पाडा) येथील जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाडी केंद्राला सकाळी ११ वाजता भेट दिली असता शाळेत शिक्षकच उपस्थित नसल्याचे दिसून आले. यावेळी शिक्षक सकाळी ११ वाजता येऊन संध्याकाळी ४ वाजता घरी जात असल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिल्याचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी लोकमतला सांगीतले. तर अंगणवाडी केंद्राला कुलूप असल्याचेही निदर्शनास आल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षकांच्या बेकायदेशीर बदल्या, संमायोजनातील घोळ, विशेष प्रोत्साहन भत्त्या साठी विशिष्ट शाळा बळकावणे इ. गैर कारणाने पालघर जिल्ह्यातील शिक्षण विभाग चांगलाच गाजला होता. काही शाळा मध्ये शिक्षकांची ही रिक्त पदे असल्याने विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणीक नुकसान टाळावे म्हणून अनेक आंदोलने आयोजित करण्यात आली होती. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊन त्यांचे भविष्य उध्वस्त होऊ नये यासाठी शिक्षणात हेळसांड करणाऱ्या विरोधात कडक कारवाईचे पाऊल उचलले जाणार असून या कारणे दाखवा नोटिशीतील खुलासा योग्य वाटला नसल्यास निलंबनाच्या कारवाईचा बडगा उचलला जाईल असा ईशारा निधी चौधरी यांनी दिला आहे.
फ्लाइंग व्हिजिटचा दणका
गैर प्रकाराची शहानिशा करता यावी यासाठी मुख्यकार्यकारी अधिकारी चौधरी यांच्या सह डहाणू पंचायत समितीचे बीडीओ अवचार यांनी डहाणूमध्ये भेटी दिल्या.
पावले पाडा, जामशेत, कामडी पाडा, तर पालघर तालुक्यातील मनोर इ. भागाला भेट दिली होती. त्यामुळे जामशेत शाळे मधील चार शिक्षक, केंद्र प्रमुख, एक आरोग्य सेविका, तीन अंगणवाडी सेविका तर मनोर येथील एका अंगणवाडी सेविकेला कारणे दाखवा नोटीस बजावली.