सोळा शिक्षकांना कारणे दाखवा , पालघर जि.प.चा गोंधळी कारभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 06:33 AM2018-09-27T06:33:17+5:302018-09-27T06:33:26+5:30
गणेशोत्सव काळात सुट्टी व्यतिरिक्त दोन दिवस गैरहजर असलेल्या १६ शिक्षकांवर तलासरी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहेत.
- सुरेश काटे
तलासरी - गणेशोत्सव काळात सुट्टी व्यतिरिक्त दोन दिवस गैरहजर असलेल्या १६ शिक्षकांवर तलासरी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहेत. वर्षभरातील सुट्टीच्या नियोजनामध्ये अचानक बदल केल्याने उत्सवकाळात सर्वच शिक्षकांचा गोंधळ उडाल्याने पालघर जि.प.तील नियोजनशुन्यता चव्हाट्यावर आली आहे.
गणेशोत्सवाची सुट्टी जि.प.च्या परिपत्रका प्रमाणे दि .१४ ते १९ सप्टेंबर पर्यंत होती. त्या नुसार शिक्षकांनी आपले नियोजन केले. काही जणांनी गणेश उत्सवसाठी गावी जाण्या येण्याचे बस रेल्वेचे आरक्षणही केले. परंतु, अचानक पालघर जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी या परिपत्रात बदल करुन सुट्टीचा कालावधी दि.१२ ते १७ सप्टेंबर असा करुन तसे आदेश पालघरचे जि.प. शिक्षणाधिकारी राजेश कंकाल यांनी ११ सप्टेंबर रोजी काढले. हा आदेश दुपारी ३ वाजे नंतर शिक्षकांच्या हाती पडला. त्यामुळे गावी जाणाºया शिक्षणाची मात्र गोची झाली. अचानक झालेल्या बदलामुळे अनेकांनी आपले परगावी जाणे रद्द केले तर काहीजण धावपळ करून १८ तारखेला कामावर रुजू झाले. काहींनी रजेचे अर्ज टाकून ते मुख्याध्यापकांकडून मंजुर करून घेतले, तर काहींना अर्ज करता आला नाही. हक्काच्या रजा शिल्लक असल्याने त्या वापरु असा विचार काहींनी केला. सुटयात बद्दल झाला तरी शिक्षक १८ सप्टेंबरच्या शाळांत रुजू झाले आदेशानुसार शाळांमध्ये ‘चलो जितें है’ हा लघुपट ही दाखिवला त्याचे फोटो ही अधिकाºयांना पाठविल. मात्र, तरीही अधिकाºयांनी शिक्षकांना वेठीस धरल्याने शिक्षकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. त्यांनी शिक्षकांचा अहवाल मागितला व गैरहजर असलेल्या शिक्षकावर कारवाईचा बडगा उगारला आहे.
गणेश उत्सव काळात ४३ शिक्षकांनी रजा मंजूर करून घेतल्या तर १६ शिक्षकानी रजेचे अर्ज न दिल्याने त्याना नोटिसा दिल्या आहेत. या नोटिसा देताना ज्यांनी रजा मंजूर करून घेतल्या आहेत त्यांनाही नोटिस दिल्या आहेत. शिक्षक संघटनेनेही या कारवाईचा निषेध केला असून कारवाई अयोग्य असल्याचे म्हटले आहे. पालघर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी राजेश कंकाल यांच्याशी मोबाईल वरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
पंतप्रधानांच्या जीवनपटासाठी...
या आदेशात स्पष्ट करण्यात आले की, पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सूचनेनुसार सार्वजनिक सुट्ट्याच्या यादीत गणपतीची सुट्टी दि.१४ ते दि.१९ होती परंतु ती सुट्टी दि.१२ पासून १७ सप्टेंबरपर्यंत असणार आहे. तसेच दि.१८ सप्टेंबर रोजी शाळा नियमितपणे सुरू राहील व त्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरील ‘चलो जितें है’ हा लघुपट सर्व शाळा मधून दाखविण्याची कार्यवाही करण्यात यावी, असा आदेश काढण्यात आला होता.
लघुपटासाठी मनमानी पद्धतीने शिक्षण विभागाने काढलेला आदेश
रजा मंजूर करण्यात यावी. पगार कपात करण्यात येऊ नये.
-दामू बरफ,
अध्यक्ष, शिक्षक परिषद संघटना, तलासरी
हक्काची रजा शिल्लक असल्याने किरकोळ रजा मंजूर करावी. प्रशासनाची ही कारवाई योग्य नाही.
- गोविंद डोंबरे,
अध्यक्ष, प्राथमिक शिक्षक संघटना ,तलासरी
गैरहजर असलेल्या १६ शिक्षकाना नोटिस दिल्या आहेत. लवकरच योग्यती कारवाई होईल.
- सदानंद जनाथे, गट शिक्षण अधिकारी, तलासरी