वीज ग्राहकांना अ‍ॅव्हरेज रीडिंगचा शॉक

By admin | Published: June 8, 2015 04:32 AM2015-06-08T04:32:45+5:302015-06-08T04:32:45+5:30

ग्राहकांना सुरळीत सेवा मिळावी, याकरिता रिडींग घेणे, वीज देयके वाटणे यासाठी नेमलेल्या खाजगी संस्थांकडून ग्रामीण भागात नियमित रिडींग घेऊन देयके वाटप केली जात नाही.

Shower of average readings to power consumers | वीज ग्राहकांना अ‍ॅव्हरेज रीडिंगचा शॉक

वीज ग्राहकांना अ‍ॅव्हरेज रीडिंगचा शॉक

Next

घोलवड : महावितरणवरील कामाचा भार हलका व्हावा आणि ग्राहकांना सुरळीत सेवा मिळावी, याकरिता रिडींग घेणे, वीज देयके वाटणे यासाठी नेमलेल्या खाजगी संस्थांकडून ग्रामीण भागात नियमित रिडींग घेऊन देयके वाटप केली जात नाही. त्यामुळे कंपनी अनेकवेळा ग्राहकांना अ‍ॅव्हरेज रिडींगचा शॉक देत आहे.
बोर्डी, घोलवड, जांबुगाव, अस्वाली, भिनारी, कोसबाड, चिखले, नरपड, कैनाड आदी ग्रामीण भागात हिच परिस्थिती असून केवळ वरिष्ठ कार्यालयाच्या सूचनेनुसार अ‍ॅव्हरेज रिडींग वाढवले जात असल्याचे समजते. मात्र हा भुर्दंड ग्राहकांना का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सध्या प्राप्त होणारी वीज देयके ग्राहकांसाठी प्रचंड डोकेदुखी ठरत आहेत. या देयकांमध्ये मोठ्या प्रमाणात चुका राहतात. अनेकवेळा अ‍ॅव्हरेज रिडींग वाढवण्यात येत असल्याने मागील रिडींग जास्त तर,चालू रिडींग कमी, युनिट, एकुण वीज वापर यात तफावत आहे. (वार्ताहर)

Web Title: Shower of average readings to power consumers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.