जव्हार तहसीलमध्ये सर्वत्र शुकशुकाट

By Admin | Published: June 13, 2017 03:07 AM2017-06-13T03:07:38+5:302017-06-13T03:07:38+5:30

पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा व तलासरी हे शंभर टक्के आदिवासी तालुके असून त्यामध्ये प्रशासनाच्या विविध पदांवर कार्यरत असणारे अधिकारी अजूनही

Shravkukkat everywhere in Jawhar tehsil | जव्हार तहसीलमध्ये सर्वत्र शुकशुकाट

जव्हार तहसीलमध्ये सर्वत्र शुकशुकाट

googlenewsNext

- हुसेन मेमन । लोकमत न्यूज नेटवर्क
जव्हार : पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा व तलासरी हे शंभर टक्के आदिवासी तालुके असून त्यामध्ये प्रशासनाच्या विविध पदांवर कार्यरत असणारे अधिकारी अजूनही येथे वास्तव्यास नाहीत. त्यामुळे येथील तहसीलमध्ये शुकशुकाटच असतो.
प्रामुख्याने जव्हारचा विचार करता येथे येणारे अधिकारी नियुक्त असतांनाही येथे स्थायिक नाहीत. नाशिक, ठाणे, कल्याण व पालघर येथून ते रोज ये-जा करतात. या मुळे येथील स्थानिकांच्या समस्या सुटत नाहीत कामे होत नाहीत. कुपोषण, रोजगार, शिक्षण व बालमजुरी या येथील प्रमुख समस्या आहेत. मात्र, जिल्ह्याच्या विकासाचा गाडा हाकणारे प्रशासकीय अधिकारी येथे राहतच नसल्याने ते अद्यापही या भागाशी समरस झालेले नाहीत. उशिरा येणे, कामाला दांड्या, कामाचा अतिरीक्त बोझा या प्रकारामुळे आजही अनेक प्रकारणांच्या फाईली रखडलेल्या आहेत. जर एखादी आपत्कालिन परिस्थिती निर्माण झाल्यास ती नियंत्रणात आणणे अशक्य ठरावे अशी स्थिती आहे.
तालुक्याच्या ठिकाणी काम करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांपासून शिपाया पर्यंत सर्वांनाच इतर भागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपेक्षा अधिक पगार शासनाकडून मिळतो. यामध्ये दुर्गम भागात काम करीत असल्याच्या विशेष भत्त्याचा समावेश असतो. तरीही ही अवस्था आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या कारवाईनंतरही येरे माझ्या मागल्या
या भागातील शिपाई, शिक्षक, आश्रमशाळा, आरोग्य, बांधकाम विभाग, पंचायत समिती, ग्रामसेवक महसूल खाते अशा विभागातील कर्मचारी तालुक्यात राहत नाहीत. त्यामुळे जिल्हाधिकारी प्रशांत नरनावरे यांनी जव्हार-मोखाडा येथील कार्यालयात अचानक भेट देऊन अनुपस्थित कर्मचाऱ्यांवर निलबंनाची तर काही कर्मचाऱ्यांवर शो कॉज बजावल्या आहेत. मात्र, तरीही परिस्थिती जैसे थे आहे.

एक नव्हे असंख्य कारणे : कधी दौरा, कधी मिटींंग, कधी अतिरीक्त कार्यभार तर कधी मुख्यालयाला जावे लागणे अशी अनेक कारणे कागदोपत्री दाखवून कार्यालयात नसण्याचे समर्थन केले जाते त्यात जोडून सुट्या त्याला जोडून घेतलेल्या रजा, आजारपण, प्रतिनियुक्ती, प्रशिक्षण, हंगामी कार्यभार अशाचीही भर पडते त्यातून कार्यालयात शुकशुकाट निर्माण होतो.

निवासी भत्त्याची ‘चोरी’
पावसाळ्याच्या दिवसात तर कुठे पुलावर पाणी साचले अन कुठे दरड कोसळली तर अनेक कार्यालयात शुकशुकाट असतो. याचा परीणाम येथील विकास कामे व जनतेची दैनंदिन कामे यावर होतो. रोजगाराअभावी बांधवांना खळगी भरण्यासाठी स्थलांतरित व्हावे लागते. मात्र, निवासी भत्त्यासाठी खोटी माहीती पुरवून शासनाची दिशाभूल करण्याचे काम हे कर्मचारी करतात.

Web Title: Shravkukkat everywhere in Jawhar tehsil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.