‘शुभमंगल कर्ज योजने’ला आॅफलाईनचा फटका, शेतकरी झाले त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 11:49 PM2018-02-23T23:49:25+5:302018-02-23T23:49:25+5:30
शेतक-याच्या मुला-मुलींच्या लग्नासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेतून ‘शुभमंगल योजने’ अंतर्गत तीन लाखाचे कर्ज दिले जाते.
कल्याण : शेतक-याच्या मुला-मुलींच्या लग्नासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेतून ‘शुभमंगल योजने’ अंतर्गत तीन लाखाचे कर्ज दिले जाते. मात्र या कर्जासाठी शेतकºयाच्य सातबारावर तारणासाठी जो बोजा चढवावा लागतो. त्याची प्रक्रिया आॅनलाइन ठेवली आहे. आॅनलाईनचा सर्व्हर अनेक वेळा डाऊन असतो. त्यामुळे शेतकºयांची कर्ज प्रकरणे मार्गी लागत नसल्याच्या तक्रारी शेतकºयांनी केल्या.
राज्य सरकारने शेतकºयांच्या सातबाºयावरील फेरफाराची प्रक्रिया आॅनलाईन केली. त्याला तीन वर्षे उलटून गेली. शेतकºयांच्या मुलामुलींच्या लग्नकार्यासाठी शुभमंगल योजनेअंतर्गत तीन लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते. त्यासाठी तारण ठेवावे लागते. घर अथवा त्याच्याकडे असलेल्या जमिनीचा काही भाग तो तारण ठेवू शकतो. याच प्रक्रियेला सातबारावर बोजा चढविणे असे म्हटले जाते. ही प्रक्रिया आॅनलाईन आहे. आॅनलाईन प्रक्रियेमुळे कर्ज प्रकरणे लवकर मार्गी लावणे, त्यात पारदर्शकता आणणे हा सरकारी यंत्रणांचा मुख्य उद्देश आहे. मात्र याच उद्देशाला हरताळ फासला जात आहे. सर्व्हर डाऊन झाल्याने आॅनलाईन बोजा चढविण्याची प्रक्रिया पूर्ण होत नाही. परिमाणी मुला-मुलींच्या लग्नासाठी कर्ज घेण्यात अडचण उद््भवते. यापूर्वी बोजा चढविण्याचे काम तलाठ्यांकडे होते. आता प्रक्रियाच आॅनलाईन असल्याने तलाठी लेखी बोजा चढविण्याची प्रक्रियेत कानावर हात ठेवतात. सातबाºयावर थेट बोजा चढवून दिला जात नाही. शेतकºयाच्या शेतजमीनीत अनेक हिस्सेदार असतील, तर बोजा चढविण्याची प्रक्रिया अधिक किचकट व डोकेदुखीची होते. शेतजमिनीच्या खरेदी-विक्री प्रकरणातही हस्तक्षेप करता येत नाही. आॅनलाईन प्रक्रियेऐवजी तलाठ्यामार्फत त्याची पूर्तता केल्यास शुभमंगल योजनेची रखडलेली कर्ज प्रकरणे मार्गी लागू शकतात. अथवा सर्व्हर डाऊन होणार नाही. तो सातत्याने नीट चालत राहील, याची काळजी सरकारी यंत्रणेने घेतली पाहिजे. ती घेतली जात नाही, असे शेतकºयांचे म्हणणे आहे. सध्या लग्नसराई आहे. अनेक शेतकºयांकडे सोयरिक जुळलेली आहे. साखरपुडे झालेले आहेत. शुभमंगल योजनेतून कर्ज मिळेल या आशेवर त्यांनी लग्नाची जुळवाजुळव केली आहे. पण वेळेत कर्जच मिळाले नाही, तर लग्नाचा खर्च कसा भागविणार, असा प्रश्न घेसरचे गजाजन मांगरुळकर यांनी केला.