एका वराशी दोन वधूंचे एकाच मंडपात शुभमंगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 11:29 PM2019-04-10T23:29:32+5:302019-04-10T23:29:37+5:30

व्हायरल लग्नपत्रिकेची जोरदार चर्चा : २२ एप्रिल रोजी तलासरीतील मु. वसा येथे पार पडणार

Shubhamangal in the same troupe of two brides with one bride | एका वराशी दोन वधूंचे एकाच मंडपात शुभमंगल

एका वराशी दोन वधूंचे एकाच मंडपात शुभमंगल

googlenewsNext

सुरेश काटे।
लोकमत न्यूज नेटवर्क
तलासरी : एकाच मंडपात दोन वधूशी एका वराचे लग्न असे, ऐकल्यावर कुणालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. परंतु पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यात वसा सुतारपाडा येथे राहणाऱ्या संजय धाडगा यांचे एकाच मंडपात दोन वधूशी २२ एप्रिल रोजी लग्न पार पडणार आहे. पेशाने रिक्षाचालक असलेले संजय आपल्या दोन बेबी व रिना यांच्या समवेत विवाह बंधनात बद्ध होणार आहेत. हा लग्नसोहळा एकाच मंडपात पार पडणार असून त्यासाठी घरासमोरील आवरात लग्न मंडपची तयारी सुरू झाली आहे.


त्याचे असे झाले की, संजय धाडगा आणि बेबी व रीना या दोन वधूची नावे असलेली लग्न पत्रिका सोशल मिडीयावर व्हायरल झाली. त्यानंतर एकाच मंडपात एका वराच्या दोन वध्ांूशी होणाऱ्या या अनोख्या लग्नाची चर्चा शहरी भागामध्ये गत चार दिवसांपासून रंगली असली तरी आदिवासी समाजात मात्र अशी परंपराच आहे. आई वडिलांचे छत्र हरपलेल्या संजय ने रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह सुरू केला आणि १० वर्षांपूर्वी बेबी नावाच्या मुली सोबत त्याने आदिवासी प्रथे प्रमाणे संसार सुरु केला. ८ वर्षांपूर्वी रिना नावाच्या तरुणीशी त्याचे प्रेम जुळले. अन् बेबीच्या संमतीने रीना घरी आली. पुढे बेबी व रीना या दोघी संजय बरोबर एकाच घरात राजीखुशीने संसार करु लागल्या. सध्या बेबीला एक मुलगा एक मुलगी तर रिनाला एक मुलगी असून ते शिक्षण घेत आहेत.


संजय याची पहिली पत्नी बेबी किराणा दुकान चालवते तर रीना गुजरात मधील कंपनीमध्ये नोकरी करते तर संजय रिक्षा चालवून या सुखी संसाराचा गाडा हाकतो आहे. या दोघी सवती असल्या तरी संजयचा संसार सुखाने करतात. याबाबत बेबी व रिना कडून त्यांची प्रतिक्रि या जाणून घेतली असता, आम्ही दोघी ही एकत्र एकाच घरात राहत असून सुखाने संसार करीत असल्याचे सांगतात. जेव्हा इच्छा होती तेव्हा लग्न करण्यासाठी लागणारे पैसे नसल्याने राहुन गेलेला विवाह सोहळा आता होणार असल्याचा आनंदही त्यांनी व्यक्त केला.

ही तर आदिवासींची पारंपरिक प्रथा
सोयीचा भाग म्हणून व सामाजिकता टिकविण्यासाठी आधी विवाह निश्चित करुन संसार सुरु करा व जेव्हा जवळ पुरेसे पैसे असतील तेव्हा त्या विवाहाचा सोहळा करा अशी परंपरा आदिवासी समाजात आहे. त्यामुळे आई-वडिलांच्या लग्नात त्यांची मुले नाचतात असे दृष्य पहावयास मिळते. विवाह सोहळ्यात गावाला अथवा पाड्याला मांसाहारी जेवण ओल्या पार्टीसह द्यावे लागते. तो खर्च खूप मोठा असतो.
तो परवडणे शक्य नसल्याने ही परंपरा सुरु झाली आहे. काही जण एवढे आर्थिक बळ जवळ नसेल तर एखाद्या धनिकाकडून तेवढे कर्ज घेऊन त्याचा लगिनगडी होणे पसंत करतात. लगिनगडी होेणे म्हणजे लग्नासाठी घेतलेले कर्च फेडण्याकरत कर्ज देणाºयाचा वेठ बिगार नवºयाने अथवा नवरा-बायकोने होणे असा असतो. म्हणून त्याला लगीनगडी असे म्हटले जाते. अजूनही ही प्रथा आदीवासींमध्ये सुरु आहे.

Web Title: Shubhamangal in the same troupe of two brides with one bride

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.