चांदीपमध्ये बाहुला बाहुलीचा विवाह सोहळा थाटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 12:38 AM2018-01-17T00:38:40+5:302018-01-17T00:38:45+5:30
मकरसंक्रांतीत पतंगोत्सव, हळदी कुंकू या प्रकारचे अनेक सामाजिक बांधिलकी जपणारे कार्यक्र म केले जातात. पण वसई पूर्व भागातील चांदीप या गावात गेल्या पाच वर्षांपासून
सुनिल घरत
पारोळ : मकरसंक्रांतीत पतंगोत्सव, हळदी कुंकू या प्रकारचे अनेक सामाजिक बांधिलकी जपणारे कार्यक्र म केले जातात. पण वसई पूर्व भागातील चांदीप या गावात गेल्या पाच वर्षांपासून मकरसंक्र ातीच्या दुसºया दिवशी बाहुला बाहुलीचा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात गावकरी साजरा करतात. या सोहळयात सर्व गाव एकत्र येत असते.
संक्रांतीचा दुसरा दिवस म्हणजे कर या दिवशी संध्याकाळी हा अनोखा विवाह सोहाळा प्राथमिक शाळेच्या आवारात साजरा होतो. प्रथम याच गावातील डोंगरपाडा येथून डी जे च्या तालावर वाजत गाजत बाहुला रुपी नवरा गावात मोठ्या थाटामाटात आणला जातो. गावातील महिला वर्ग बाहुली रु पातील नवरीला सजवून बाशिंग बांधून लग्न मंडपात आणतात. देवा ब्राम्हणांच्या साक्षी ने मोठ्या थाटामाटात विवाह सोहळा होतो. तो झाल्यावर वाहुला बाहुली ची वरात वाजतगाजत काढली जाते ती डोंगरपाडा येथे गेल्यावर या सोहळयाची सांगता होते.
हा लग्न सोहाळा गावातील सर्व महिला एकत्र येऊन साजरा करतात. त्यात खूप धम्माल करतात. या सोहळयामुळे आमच्यात एकी निर्माण होत असून त्यात सर्व जातीधर्माचे नागरीक सहभागी होत होत असतात. त्याच्या वेगळेपणामुळे तो आता गावाचे भूषण ठरला आहे. .
- जयश्री किणी,
नगरसेविका चांदीप