नगरसेवकाच्या मुलीचे साधेपणाने लग्न; वाचलेल्या पैशातून गरिबांना मदत 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2020 04:07 PM2020-06-21T16:07:06+5:302020-06-21T16:07:30+5:30

"एकीकडे कोरोनाचे संकट - त्यात खंडग्रास सूर्यग्रहण -तर दुसरीकडे आज सर्वत्र फादर्स डे साजरा होत असताना इथे वसईत काही नवलच पाहायला मिळाले "! खरोखरच समाजव्यवस्था बदलत आहे, होय कोरोना ने खूप शिकवलं ?

The simple marriage of a corporator's daughter; Help the poor with the money saved | नगरसेवकाच्या मुलीचे साधेपणाने लग्न; वाचलेल्या पैशातून गरिबांना मदत 

नगरसेवकाच्या मुलीचे साधेपणाने लग्न; वाचलेल्या पैशातून गरिबांना मदत 

googlenewsNext

आशिष राणे

वसई - आपण नेहमी जगभर व  देशातील मोठमोठ्या राजकीय, उद्योग जगतातील बडी मंडळी व पुढाऱ्यांच्या मुला-मुलींच्या लग्नाचे सोहळे बहारदार होताना पाहिले आहेत,आणि त्या लग्नसोहळ्यावर होणारा अमाप करोडोचा खर्च हि पहिला आहे. परंतु, कोरोना या विषाणूच्या संक्रमणामुळे आता अवघ जग व सारेच जण मग तो गरीब असो का श्रीमंत सर्व एकाच पातळीवर खाली आले आहेत. दरम्यान वसईत असाच एक अतिशय नम्र ,सुंदर अशी शुभ लग्न घटना घडली असून या लग्न घटनेचे अवघ्या सर्व समाजाला उदाहरण घायला लावेल असे काहीसे घडले आहे.

वसईतील चुळणे गाव स्थित बविआचे जेष्ठ नेते ,साहित्यिक तथा नगसेवक फ्रॅंक डिसोजा आपटे यांच्या कन्येचा विवाह अगदी साधे पणात अवघ्या दहा जणांच्या उपस्थितीत संपन्न झाला फ्रँक डिसोजा यांनी या विवाह सोहळ्यातून नेता कसा असावा याचे उमदे उदाहरण सर्व समाजाला दाखवून दिले आहे. खरं तर रविवारी खंडग्रास सुर्य ग्रहण त्यात फादर्स डे आणि कोरोना चे संकट या तिहेरी घडामोडी डोक्यावर असताना लग्न या संकल्पनेला साधेपणा ने घेत या विवाहातून वाचलेल्या पैश्यातून आपटे यांनी गरीब आदीवासी असलेल्या पाड्यावर मदतीचा हात देणार असल्याचे लोकमत शी बोलताना सांगितले.
आपण ब-याच वेळा ऐकलं असेल,वाचलं असेल,पाहिलं देखील असेल की अमुक अमुक नेत्यांच्या सोहळ्यात करोडो रुपये खर्च करण्यात आले. वधू-वर किलोच्या सोन्यात सजले गेले खाण्यापिण्यात लाखो रुपये उधळले गेले. जणू गरीबांच्या लाचारीवर मारलेली ही एक चपराक असते किंवा आपल्या पोकळ डोलाराचा मी पणा असतो. मात्र बविआ चे चुळणे चे नगरसेवक फ्रॅंक आपटे ह्याला पूर्ण अपवाद ठरले, खरंच टाळेबंदी शिथिलला असतानादेखील नगरसेवक व सभागृह नेते  फ्रॅन्क डिसोजा (आपटे). आपली सुकन्या कुमारी रिचा डिसोजा हिचा विवाह कुमार जाॅन्सन डिसा, गास ह्यास बरोबर रविवारी  दि. 21 जून २०२० रोजी अत्यंत साधेपणा ने संपन्न झाला. 

कुठलाही गाजावाजा न करता अगदी साधेपणाने हा सोहळा केवळ 10 जणांच्या उपस्थितीत  पार पडला ,  ब-याच जणांना मनोमनी वाटत होतं की आपल्या समाजात लग्नसराईत होत चाललेला अमाप खर्च, चंगळवाद.,आणि यामुळे तरुणांची दिवसेंदिवस वाढत चाललेली नशाबाजी कुठेतरी थाबांवी. बरंचस अन्न वाया जाणा-या ह्या झगमगाटात साधेपणाची कुणीतरी एक पणती पेटवावी म्हणजे माणसाच्या मनात विवेकाच्या ज्योती प्रज्वळीत करण्याचे काम या विवाहाने केला आहे. त्यातच फ्रँक डिसोजा आपटे हे एक साहित्यिक असून साहित्य हे जगण्याच्या प्रसारमाध्यमांतनं येत असतं हे आपल्या क्रांतिकारी व समर्थ विचारांनी पुन्हा एकदा त्यांनी अशा प्रतिकुल परिस्थितीत देखील सिद्ध केले आहे. लॉकडाऊन व कोरोना नसता तर नक्कीच लाखोंचा खर्च झाला असता तरीदेखील आपण आजही विवाहासाठी खर्च येणाऱ्या पैश्यातून चुळणे स्थित आदिवासी पाड्यावरील गरिबांना मदतीचा हात  देणार आहेत, असे डिसोजा यांनी म्हटले. 
 

Web Title: The simple marriage of a corporator's daughter; Help the poor with the money saved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.