शिपाईभरती चौकशी संयुक्त समितीकडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 01:54 AM2018-03-26T01:54:27+5:302018-03-26T01:54:48+5:30
जिल्हा परिषदेतील अपंग एकात्मिक शिक्षण योजनेतीळ शिपाई भरती व समायोजन प्रक्रि येत अनियमतिता असल्याची कबुली
पालघर : जिल्हा परिषदेतील अपंग एकात्मिक शिक्षण योजनेतीळ शिपाई भरती व समायोजन प्रक्रि येत अनियमतिता असल्याची कबुली शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधानपरिषदेत दिली असून अधिक चौकशीसाठी विशेष तपास पथक व आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग यांची संयुक्त समिती नेमण्यात आल्याचे यावेळी त्यांनी जाहीर केले.
पालघर जिल्हा परिषदेत शिपाईची पदे रिक्त असल्यामुळे ती भरण्यासाठी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी शिक्षण उपसंचालकांना पत्र पाठवून या योजनेतील शिपाई सामावून घेण्याची तयारी दाखविली होती. त्यानुषंगाने जिल्हा परिषदेसमोर ८० शिपाई समायोजनाचा प्रस्ताव ठेवला गेला मात्र हि प्रक्रि या बेकायदेशीर व अनधिकृत असल्याचे लक्षात येताच सर्व पक्षीय पदाधिकारी-सदस्यांनी चौकशी करण्यासाठी शासनाला पत्र दिले. त्यानुषंगाने उपसचिवांनी याची सखोल चौकशी करून तिचा अहवाल सचिवांकडे सादर केल्यानंतर यात दोषींविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश त्यांनी जिल्हा परिषदेस दिले होते. त्यानुषंगाने कनिष्ठ प्रशासन अधिकारी व वरिष्ठ सहायक अशा दोन अधिकार्यांवर गुन्हे दाखल झालेले आहेत.त्यानंतर कोकण आयुक्तांनीही या दोन अधिकाºयांची चौकशी केली असून उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन विभाग) यांच्याविरोधात चौकशीचे आदेश दिले आहेत.