सिंगे, रोशन आणि गोयल यांची बदली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 03:21 AM2018-07-29T03:21:15+5:302018-07-29T03:21:26+5:30
पालघरचे पोलीस अधिक्षक मंजुनाथ सिंगे, वसईचे अप्पर पोलीस अधीक्षक राजतिलक रोशन, व पालघरचे उपविभागीय पोलीस अधिकारी निमित्त गोयल यांची बदली करण्यात आली आहे.
पालघर : पालघरचे पोलीस अधिक्षक मंजुनाथ सिंगे, वसईचे अप्पर पोलीस अधीक्षक राजतिलक रोशन, व पालघरचे उपविभागीय पोलीस अधिकारी निमित्त गोयल यांची बदली करण्यात आली आहे. सिंगे यांची बदली मुंबईच्या पोलीस उपायुक्त पदी करण्यात आली आहे. तर, रोशन यांची बदली नागपूर शहरच्या उपायुक्त पदावर तर गोयल यांची अपर पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग येथे बदली झाली आहे.
मंजुनाथ सिंगे यांच्या जागी राजभवनातील राज्यपालांचे परिसहायक गौरव सिंग यांची वर्णी लागली आहे. तर वसईचे अपर पोलीस अधीक्षक यांच्या जागी अकोल्याचे अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पोलीस प्रशासन सेवेतील अधिकारी मंजुनाथ सिंगे यांना गडचिरोलीहून पालघरचा पदभार देण्यात आला होता. एप्रिल २०१७ ला त्यांनी आपल्या अधीक्षक पदाचा पदभार सांभाळला होता. मात्र, १५ महिने उलटत नाही तोवर त्यांची बदली करण्यात आली. पालघरच्या दोन पत्रकारावर गुन्हे दाखल करण्याबाबत जिल्ह्यातील सर्व पत्रकारांनी एकजुटीचे दर्शन घडवीत पालघर मध्ये आंदोलने केली होती. नागपूरच्या अधिवेशनात या प्रकरणाचे पडसाद उमटले होते. सभापती रामराजे निंबाळकर यांनी सिंगे, पोनि.किरण कबाडी, पोउनी.तौफिक सय्यद याच्या विरोधात कारवाईचे आदेश गृहविभागाला दिले होते.
वसईमध्ये नव्याने रु जू होणारे अपर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांनी यापूर्वी बोईसरचे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून काम पाहिले असून पालघर मध्ये दिवसाढवळ्या एका तरु णाचा झालेल्या खून प्रकरणाचा त्यांनी अवघ्या ५ दिवसात छडा लावीत आरोपीना अटक करण्यात यश मिळविले होते.
डी.जी.ची भेट घेणार
पत्रकार मारहाण प्रकरणी पोलीस निरीक्षक किरण कबाडी आणि उपनिरीक्षक तौफिक सय्यद यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचे आदेश सभापती रामराजे निंबाळकर यांनी देऊनही कारवाई होत नसल्याने शिवसेनेच्या आमदार डॉ. निलम गोºहे महासंचालकांची (डी.जी.) भेट घेणार आहेत.
या प्रकरणातील पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे यांची बदली करण्यात यावी तसेच पोलीस निरीक्षक किरण कबाडी आणि उपनिरीक्षक तौफिक सय्यद यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवसेना प्रवक्त्या आ. डॉ. नीलम गोºहे यांनी दि.१६ जुलै २०१८ रोजी औचित्याच्या मुद्द्याद्वारे नागपूर पावसाळी अधिवेशनात केली होती.
शुक्रवारी सरकारने काढलेल्या शासन निर्णयानुसार सिंगे यांची बदली करण्यात आली आहे. याबाबत आ. डॉ. गोºहे यांनी समाधान व्यक्त केले. तसेच पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांच्याकडे पोलीस निरीक्षक कबाडी आणि उपनिरीक्षक सय्यद यांच्यावर कारवाईची मागणी करणार आहेत.