साहेब! कारवाई नको प्रमोशन द्या- हाळपे

By admin | Published: August 31, 2016 02:50 AM2016-08-31T02:50:12+5:302016-08-31T02:50:12+5:30

न्यूकलेट बजेटच्या बोगस योजना राबवून संगनमताने भ्रष्टाचार करणारे सहाय्यक प्रकल्प अधिकारी राजाराम हाळपे यांची प्रमोशनसाठी धावपळ सुरु आहे.

Sir! Do not take action; Promotion; | साहेब! कारवाई नको प्रमोशन द्या- हाळपे

साहेब! कारवाई नको प्रमोशन द्या- हाळपे

Next

रविंद्र साळवे, मोखाडा
न्यूकलेट बजेटच्या बोगस योजना राबवून संगनमताने भ्रष्टाचार करणारे सहाय्यक प्रकल्प अधिकारी राजाराम हाळपे यांची प्रमोशनसाठी धावपळ सुरु आहे. पालकमंत्री विष्णू सवरा यांच्याकडे प्रकल्प अधिकारी या पदाच्या प्रमोशनसाठी हाळपे यांच्याकडून फाईल प्रस्तवित करण्यात आली असल्याचे समजते. त्यामुळे आता सवरा हे या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर प्रकल्प कार्यालयाच्या कामकाजात पारदर्शकक्षता आणण्यासाठी कारवाई करणार का? पाठीशी घालून प्रमोशनसाठी शिफारस करणार अशी स्थिती निर्मिण झाली आहे.
भ्रष्टाचारमुळे वाभाडे उडाले असतांना देखील मी जव्हार येथे प्रकल्प अधिकारी म्हणून रुजू होणार असल्याचे ठामपणे हाळपे सांगत आहेत. सन २००६-७ ते २०१४-१५ च्या दरम्यान आदिवासी समाज प्रबोधन संस्थेचे अध्यक्ष नवसू सोमा दिघा आणि हाळपे पाटील यांनी संगनमताने भ्रष्टाचार केल्याचे प्रकरण लोकमत चव्हाट्यावर आणून पाठपुरावा केल्याने त्याबाबत कारवाई सुरु झाली आदिवासी प्रबोधन संस्थेविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले गेले मात्र अजून हाळपे पाटील यांच्या विरोधात दोषारोप सादर केलेले नाही. (वार्ताहर)

Web Title: Sir! Do not take action; Promotion;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.