जव्हारमधील रस्त्यांची अवस्था दयनीय, विरोधी पक्षनेत्याचा उपोषणाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 04:24 AM2019-02-18T04:24:45+5:302019-02-18T04:24:57+5:30

आदेश देऊनही कामे करत नाहीत ठेकेदार :विरोधी पक्षनेत्याचा उपोषणाचा इशारा

The situation in the jawar road is pathetic, the opposition leader's fasting gesture | जव्हारमधील रस्त्यांची अवस्था दयनीय, विरोधी पक्षनेत्याचा उपोषणाचा इशारा

जव्हारमधील रस्त्यांची अवस्था दयनीय, विरोधी पक्षनेत्याचा उपोषणाचा इशारा

Next

हुसेन मेमन

जव्हार : नगर परिषद हद्दीतील रस्त्यांची दुरावस्था झाली असून मुख्य रस्त्यांवर खड्डेच खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे वाहनांना व नागरीकांना त्रास सहन करावा लागत आहे. मागील दोन वर्षांपासून नेहरू चौक ते पाचबत्ती रस्ता व राजू काळे सर्व्हीस स्टेशन ते नगर पालिका शाळा हा रस्ता तयार करण्यात परिषद असमर्थ ठरली असून, रस्ता इतका खराब झाला आहे की, तेथे वारंवार दुचाकी व चारचाकीचे अपघात होत आहेत.

या रस्त्यायाच्याकामाची निविदा प्रक्रि या कित्येक वेळा पूर्ण झाली मात्र काही कारणास्तव नेहरू चौक ते पचबत्ती रस्ता निविदा रद्द कराव्या लागल्या मात्र या निविदा पुन्हा निघून वर्षाचा कालावधी होऊनही प्रशासनाकडून आजही कामे आज होतील उद्या होतील असे उत्तरे देऊन वेळ मारून नेली जात आहे.
तसेच राजू काळे सर्व्हिस स्टेशन ते नगर पालिका रस्ता निविदा पूर्ण होऊन आज तीन वर्षाहून अधिक कालावधी होऊन गेला आहे, मात्र रस्ता आजही अपूर्ण अवस्थेत आहे. याबाबत कार्यलयाला विचारले असता संबंधित ठेकेदाराला वारंवार सूचना देऊनही कामे करत नाहीत म्हणून आम्ही मे. हर्षद गंधे, वाडा यांना काळ्या यादीत टाकण्यासाठी कारवाई सुरू असल्याची माहिती मिळाली. ठेकेदारांची चुकी सर्व साधारण नागरिकांनी का सोसावी असाही प्रश्न जनता करीत असून तीन वर्षापर्यंत प्रशासन काय करीत होते? प्रत्येक निविदेत काम पूर्ण करण्याची मुदत नमूद असते, जर काम वेळेवर केले नाही तर त्याला दंड आकरला जातो, मात्र असे काहीही झाले नाही. मागील वर्षी लोकसभच्या पोटनिवडणूक प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांची सभा या रस्त्यावरील राजीव गांधी स्टेडियमला होती, त्यावेळी तात्काळ रस्त्यातील खड्डे बुजविण्यात आले होते, मात्र पावसाळ्यात रस्ता पुन्हा जैसे थे झाला आहे. त्यामुळे नागरीकांच्या समस्या शहरात वाढत चालल्या आहेत.

नेहरू चौक ते पचबत्ती रस्त्याची दयनीय अवस्था गेल्या काही वर्षपासून झाली आहे, या रस्त्याची निविदा प्रक्रि या मागील वर्षी पार पडल्या होत्या मात्र त्या रद्द करण्यात आल्या, नंतर पुन्हा या रस्त्याची निविदा झाली आहे, मात्र ठेकेदार काम सुरू करीत नाहीत, सदर रस्त्यांचे काम दोन दिवसात सुरू नाही झाले तर मी नगर परिषद कार्यालया समोर उपोषण करेल -दीपक कांगणे, विरोधीपक्ष नेते, जव्हार नगर परिषद

Web Title: The situation in the jawar road is pathetic, the opposition leader's fasting gesture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.