सहा बोगस डॉक्टरांना नालासोपाऱ्यात अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2018 03:19 AM2018-09-01T03:19:53+5:302018-09-01T03:20:19+5:30
नालासोपारा : शहरातील बोगस डॉक्टांराविरोधात महापालिकेच्या आरोग्य विभागाने जोरदार मोहीम उघडली असून नालासोपारा येथून ६ बोगस डॉक्टरांना अटक करण्यात आलेली आहे. त्यापैकी एक डॉक्टर पळून जाण्यात यशस्वी ठरला आहे. या डॉक्टरांकडे कुठल्याच प्रकारचे शिक्षण नव्हचे आण िबंदी असलेले, हानीकारक औषधे ते रु ग्णांना देत असल्याचे आढळून आले. कारवाईच्या दरम्यान एक बोगस डॉक्टर पळून जाण्यात यशस्वी ठरला.
गत काळात पालिकेची बोगस डॉक्टरांविरोधातील मोहीम थंडावली होती. त्यामुळे अनेकांनी आपापली दुकाने थाटली होती. वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी महाराष्ट्र मेडिकल काऊंसिलची परवागनी आवश्यक असते. मात्र, कुठल्याही परवानगी आणि नोंदणीशिवाय हे डॉक्टर व्यवसाय करत असतात. गुरूवारी महापालिकेच्या आरोग्य विभागाने नालासोपारा येथे डॉक्टरांच्या दवाखान्यात जाऊन तपासणी केली. त्यावेळी ३ बोगस डॉक्टर आढळून आले. संजकुमार सिंग (संतोष भुवन), सभजीत गौतम (संतोष भुवन), दुधनाथ यादव (श्रीराम नगर), मनोज गुप्ता (कारिगल नगर), कृष्णचंद्र पाल (संतोष भुवन) आणि रामजित पाल (कारिगल नगर) अशी नालासोपारा येथे कारावाई करण्यात आलेल्या भोंदू डॉक्टरांची नावे आहेत. यापैकी एक डॉक्टर पथकाच्या हातावर तुरी देऊन पळून जाण्यात यÞशस्वी ठरला.