चार दिवसात सहा अल्पवयीन बेपत्ता
By admin | Published: October 12, 2016 03:54 AM2016-10-12T03:54:51+5:302016-10-12T03:54:51+5:30
वसई तालुक्यातून चार दिवसात सहा अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्याच्या घटना घडल्या आहेत. नालासोपाराच्या पूर्वेकडील वलईपाडा याठिकणी राहणारी अंकिता हिरोजी तुळसकर
विरार : वसई तालुक्यातून चार दिवसात सहा अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्याच्या घटना घडल्या आहेत. नालासोपाराच्या पूर्वेकडील वलईपाडा याठिकणी राहणारी अंकिता हिरोजी तुळसकर (१७) ही मुलगी गरबा खेळण्यास घरातून गेली होती. रात्री गरब्याचा खेळ संपला तरी ती घरी परतली नाही. म्हणून तिचा शोध घेऊन ती सापडत नसल्याने तिचे वडील हिरोजी अंकुश तुळसकर यांनी तुळींज पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्र ार दिली आहे.
गोखिवरेतील खडकपाडा येथून शामू मन्नीलाल सरोज (१२) हा शिकवणीसाठी गेला होता. शौचाचे कारण देत तो शिकवणीतून घरी गेला होता. पण तो कुठे गेला याचा तपासच लागला नाही. म्हणून त्याचे वडील मन्नीलाल बुडुल सरोज यांनी वालिव पोलीस ठाण्यात तो बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली आहे.
नालासोपारा पूर्वेकडील घरकुलनगर मोरेगाव नाका येथील सतरा वर्षीय हर्षदा रमेश पाटील ही रात्रीसाडे नऊ वाजता घरातून शौचासाठी बाहेर गेली. ती परतली नसल्याने बेपत्ता झाल्याची तक्र ार तुळींज पोलीस ठाण्यात रमेश दत्ताराम पाटील यांनी केली आहे.
विरार मधील फुलपाडा येथील नारायण नगरमध्ये राहणारी माधुरी मंगेश खेडेकर (१६) ही घरातून गायब झाल्याची तक्र ार विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नालासोपारा डांगेवाडी येथील जमील शकील शेख यांची मेहुणी आफिया रईस खान (१६) आणि
भाची कौशरजहाँ रिजवान खान (१४) या दोघी हजरत चाबूक शहा
दर्गात दर्शनासाठी गेल्या होत्या. त्या घरी परत आल्या नाहीत म्हणून नालासोपारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)