वसईत सहा नवी पोलीस ठाणी

By admin | Published: January 20, 2016 01:48 AM2016-01-20T01:48:25+5:302016-01-20T01:48:25+5:30

लोकसंख्येसोबतच गुन्हेगारीचा वाढता आलेख पाहून यापूर्वी वसई-विरार परिसरात चार पोलीस ठाण्यांचा प्रस्ताव राज्य सरकारकडे असतानाच आणखी सहा नवी पोलीस ठाणी

Six new police stations in Vasaihat | वसईत सहा नवी पोलीस ठाणी

वसईत सहा नवी पोलीस ठाणी

Next

शशी करपे,  वसई
लोकसंख्येसोबतच गुन्हेगारीचा वाढता आलेख पाहून यापूर्वी वसई-विरार परिसरात चार पोलीस ठाण्यांचा प्रस्ताव राज्य सरकारकडे असतानाच आणखी सहा नवी पोलीस ठाणी आणि दोन उपअधिक्षक कार्यालये निर्माण करावीत असा नवा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. त्याचबरोबर आणखी दोन उपअधिक्षक कार्यालये स्थापन करण्याचा प्रस्तावही राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाली तर वसईत एकूण १३ पोलीस ठाण्यांसह तीन उपअधिक्षक कार्यालये तयार होतील. तर रेल्वे पोलिसांनाही विरार, नालासोपारा आणि भार्इंदर अशी तीन नवी पोलीस ठाणी हवी आहेत.
सध्या वसईत तालुक्यात वसई, माणिकपूर, नालासोपारा, विरार, तुळींज, वालीव आणि अर्नाळा सागरी पोलीस मिळून एकूण सात पोलीस ठाणी आहेत. तसेच एक उपअधिक्षक आणि एक अप्पर पोलीस अधिक्षक कार्यालय आहे. या सर्वांचे मिळून वसईत अवघे ६३४ पोलीस बख आहे. वसई तालुक्याची लोकसंख्या १८ लाखाहून अधिक झाली आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे तालुक्यात गुन्हेगारी आलेख वाढत आहे. गेल्या वर्षभरात तालुक्यात ४४ खून, ४४५ घरफोड्या, १३३ सोनसाखळी चोरींच्या घटनेसह बलात्कार, मारामारी याह अनेक गुन्ह्णांची संख्या मोठी आहे. अपुरे पोलीस बळ आणि साधनसामुग्रीमुळे गुन्हेगारी रोखण्यास पोलीस अपयशी ठरताना दिसत आहेत.
विरार पोलीस ठाण्यात गेल्या वर्षी ८७५ गन्हयांची नोंद झाली आहे. त्याखालोखाल तुळींज पोलीस ठाण्याच्या हद्दीत चारशेच्या घरात गुन्हयांची नोंद झाली आहे. एका पोलीस ठाण्यात वर्षभरात जास्तीत जास्त तीनशे गुन्ह्णांची नोंद झाली पाहिजे असा पोलीस कार्यपद्धतीचा संकेत आहे. यापेक्षा जास्त गुन्हे नोंदवले गेले तर तपास करणे अवघड होऊन बसते आणि गुन्ह्णांची उकल होत नसल्याने तक्रारदारांना न्याय मिळत नाही. त्यासाठी पोलीस विभागाने याआधी मांडवी, आचोळे आणि पेल्हार ही नवी तीन पोलीस ठाणी तयार करण्याचा प्रस्ताव पाठवला होता. राज्य सरकारने या प्रस्तावाला तत्वत: मान्यता देऊन पोलीस महासंचालकांकडून सविस्तर अहवाल मागवला आहे. आता पोलिसांनी विरार पश्चिम, कणेर आणि नायगाव पूर्व अशा आणखी तीन नव्या पोलीस ठाण्यांचा प्रस्ताव पाठवला आहे. नव्या प्रस्तावामुळे जास्त गुन्हेगारी असलेल्या विरारसह तुळींज आणि वालीव पोलीस ठाण्यांचे विभाजन होणार आहे. वसई तालुक्यासाठी सध्या एकच पोलीस उपअधिक्षक आहेत. पोलीस ठाण्यांच्या वाढीसोबत त्याचे विभाजन करून नालासोपारा आणि विरार या दोन ठिकाणी पोलीस उपअधिक्षक कार्यालये तयार करण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. हे प्रस्ताव संमत झाल्यास वसई तालुक्यात एकूण १३ पोलीस ठाणी आणि तीन उपअधिक्षक कार्यालये निर्माण होतील.
दरम्यान, मीरा रोड, भाईदर, नायगाव, वसई, नालासोपारा, विरार आणि वैतरणा रेल्वे स्टेशनसाठी मिळून वसईत एकच पोलीस ठाणे आहे. या पोलीस ठाण्याचे संख्याबळ अवघे १५० आहे. गेल्या वर्षभरात यापरिसरात रेल्वे अपघातात २६४ जणांचे प्राण गेले आणि २५४ जण जखमी झाले. तर वर्षभरात २१३ गुन्हे नोंदले गेले. या सातही स्टेशनमधून दररोज किमान दहा लाख प्रवाशी प्रवास करतात. पण, पोलीस बळ कमी असल्याने रेल्वे पोलीस प्रवाशांना सेवा देण्यात अपुरे पडताना दिसत आहे. त्यासाठी वसई रेल्वे पोलीस ठाण्याचे विभाजन करून विरार, नालासोपारा आणि भार्इंदर अशी तीन पोलीस ठाणी तयार करावीत असा प्रस्ताव पाठवला आहे.

Web Title: Six new police stations in Vasaihat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.