सहा नायजेरियनवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 11:08 PM2019-11-19T23:08:29+5:302019-11-19T23:08:31+5:30
नालासोपाऱ्यात कारवाई; वास्तव्याची अधिकृत कागदपत्रेच नाहीत
नालासोपारा : सोमवारी पहाटे नालासोपारा पूर्वेकडील प्रगतीनगर परिसरातील ५ इमारतीमध्ये मोठ्या पोलीस बंदोबस्तासह धाड मारून ५० ते ६० नायजेरियन तुळींज पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. भारतात राहण्यासाठी आवश्यक असणाºया कागदपत्रांची, पासपोर्ट याची त्यांच्याकडे चौकशी करण्यात आली. यातील सहा नायजेरियनकडे कोणताही पुरावा नसल्याने विनापरवाना भारतात राहत असल्याचा गुन्हा तुळींज पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
पूर्वेकडील प्रगती नगर परिसरातील पाच इमारतीमध्ये पोलिसांनी धाड टाकून नायजेरियन तुळींज पोलीस ठाण्यात आणले होते. त्यापैकी कॉलिन्स मदाआबूची ओन्होहो (३३), अँथोनी ओबोना इवोके (५२), ओजेगु सॅम्युएल (३४), क्लमेंट दिम (४९), सबेस्टेन इजॅकी अलोका (४६) हे नायजेरियाचे रहिवासी असून यांच्याकडे पासपोर्ट आणि व्हिसा नसतानाही ते भारतात अनधिकृतरित्या वास्तव्य करत आहेत. फफोना मोरी (२२) याच्याकडे पासपोर्ट असून व्हिसाची तारीख संपलेली आहे. या सर्वांविरोधात तुळींज पोलीस ठाण्यात परकीय नागरी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
या कारवाईबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी.एस. पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की, रूम मालकांना १८८ प्रमाणे नोटीस देण्यास सुरुवात करणार असून जे कोणी नायजेरियन नागरिकांना भाड्याने रूम देतात त्यांनी पोलीस ठाण्याशी रीतसर परवानगी घ्यावी, अन्यथा कारवाई करण्यात येईल. तसेच ज्या अनधिकृत इमारतींमध्ये नायजेरियन वास्तव्यास आहेत त्या पाडण्याबाबत आयुक्त पवार यांना भेटल्याचेही सांगितले.