सहा.निरिक्षकाला चिरडण्याचा प्रयत्न

By Admin | Published: July 8, 2015 10:17 PM2015-07-08T22:17:34+5:302015-07-08T22:17:34+5:30

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील खानिवडे टोलनाक्यावर थरार उडवणारी घटना घडली. अतीफ अन्सारी (रा. मालवणी, मालाड पूर्व) या आरोपीचा मीरा रोड येथून पोलिसांनी पाठलाग करून खानिवडे

Six. Try to crush the driver | सहा.निरिक्षकाला चिरडण्याचा प्रयत्न

सहा.निरिक्षकाला चिरडण्याचा प्रयत्न

googlenewsNext

पारोळ : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील खानिवडे टोलनाक्यावर थरार उडवणारी घटना घडली. अतीफ अन्सारी (रा. मालवणी, मालाड पूर्व) या आरोपीचा मीरा रोड येथून पोलिसांनी पाठलाग करून खानिवडे टोलनाका येथे त्याच्या गाडीला अडविले असता सहायक पोलीस निरीक्षक संदीप गीते यांच्या अंगावर स्वीफ्ट घालून त्यांना चिरडण्याचा प्रयत्न केला. आरोपीला अडविण्यासाठी पोलिसांनी आरोपीच्या दिशेने गोळीबार केला, मात्र तो पसार झाला.
या आरोपीस अटक करण्यास नवघर पोलिसांनी मीरा रोड पूर्व येथे सापळा रचला होता. त्याला अडविले असता त्याने स्वीफ्ट पोलिसांच्या अंगावर घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच आरोपीची गाडी अडविण्यासाठी पो.कॉ. कस्पाळे यांनी स्कूटी आडवी लावली असता त्यांच्या स्कूटीस जोरदार धडक दिली. या धडकेत प्रसंगावधान राखून कस्पाळे यांनी उडी मारली म्हणून ते बचावले. तो आरोपी मुंबईहून पळून जात असताना मीरा रोडवरून त्या आरोपीचा पोलीस पाठलाग करीत होते. याप्रकरणी गुन्ह्याची नोंद मांडवी पोलीस चौकी व नवघर (भार्इंदर) पोलीस स्टेशन येथे झाली असून फरार आरोपीचा नवघर पोलीस शोध घेत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Six. Try to crush the driver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.