बोर्डीत सहावा चिकू महोत्सव अत्यंत उत्साहात, दोन दिवसांत हजारो पर्यटकांचा प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 07:00 AM2018-01-30T07:00:02+5:302018-01-30T07:00:30+5:30

सहाव्या चिकू महोत्सवाचा प्रारंभ बोर्डी येथील एस. आर. सावे कॅम्पपिंग ग्राऊंड येथे शनिवारी, झाला. सलग तीन दिवस सुट्टया असल्याने पर्यटकांची प्रचंड गर्दी होती. या दोन दिवासीय महोत्सवाचे आयोजन चिकू फेस्टीवल कमिटी आणि एनकेसीसी, बोर्डी ग्रामपंचायत व ग्लोबल कोकण यांनी केले होते.

 The Sixth Cookie Festival, boasted in the boards, responded thousands of tourists in two days | बोर्डीत सहावा चिकू महोत्सव अत्यंत उत्साहात, दोन दिवसांत हजारो पर्यटकांचा प्रतिसाद

बोर्डीत सहावा चिकू महोत्सव अत्यंत उत्साहात, दोन दिवसांत हजारो पर्यटकांचा प्रतिसाद

Next

- अनिरु द्ध पाटील
बोर्डी : सहाव्या चिकू महोत्सवाचा प्रारंभ बोर्डी येथील एस. आर. सावे कॅम्पपिंग ग्राऊंड येथे शनिवारी, झाला. सलग तीन दिवस सुट्टया असल्याने पर्यटकांची प्रचंड गर्दी होती. या दोन दिवासीय महोत्सवाचे आयोजन चिकू फेस्टीवल कमिटी आणि एनकेसीसी, बोर्डी ग्रामपंचायत व ग्लोबल कोकण यांनी केले होते.
बोहाडा या आदिवासी नृत्यप्रकाराने त्याचा प्रारंभ झाला. चिकू फळाप्रमाणेच स्थानिक पिकांपासून बनविलेल्या प्रक्रि या उद्योगाला चालना देणे हा आयोजनाचा हेतू असून पर्यटकांच्या प्रतिसादाने हा उद्देश यशस्वी झाल्याचे आयोजकांनी सांगितले. येथे शंभर पेक्षा अधिक विविध वस्तूंचे स्टॉल उभारण्यात आले आहेत. त्या मध्ये आदिवासी चित्र, विविध गृहोपयोगी वस्तू तसेच खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सचा समावेश होता. समुद्रातील विविध मत्स्य पदार्थांची लज्जत चाखण्याला पर्यटकांनी अधिक पसंती दिली. आगमनापासून ते बाहेर पडेपर्यंत आपण एका वेगळयाच गावातून फेरफटका मारल्याचा प्रत्यय अभ्यागतांना आला.
इंडियन मेडिकल असोसिएशन डहाणू तर्फे अवयवदान जनजागृती आणि नोंदणी तसेच अंबामाता बालक-बालिका अनाथाश्रम अंबिस्ते यांच्याकडून विविध साहित्याची विक्री, कृषी विभागाकडून फळं आणि भाजीपाल्यांची माहिती व पंचायत समिती पशू विभागातर्फे देण्यात येणारे संदेश यामुळे हा महोत्सव शेतकाºयांंसाठी अधिक उपयुक्त ठरला.
दरम्यान सहाव्या चिकू महोत्सवाने ग्लोबल रूप धारण केल्याने तो शेतकरी आणि आदिवासींपासून दूरावल्याची खंत व्यक्त झाली. शिवाय कृषीमालाचे बॅ्रंडिंग कमी आणि शहरी पर्यटकांना आकर्षित करतील अशा बाबींवर जास्त भर दिल्याचे मत बागायतदारांनी व्यक्त केले. गाड्या जाहिरातीसाठी मांडून जागा अडविण्यापेक्षा, स्थानिक महिला बचत गटांना उत्पादन विक्रीसाठी स्टॉल करिता दिले असते तर रोजगाराच्या रुपाने महिला सक्षमीकरण झाले असते अशी कुजबुज ऐकू येत होती.

Web Title:  The Sixth Cookie Festival, boasted in the boards, responded thousands of tourists in two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.