साठ नवे वर्ग, नववीची समस्या सुटली लोकमत न्यूज नेटवर्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 01:59 AM2017-08-02T01:59:23+5:302017-08-02T01:59:23+5:30
या जिल्ह्यात जिल्हा परिषदेमार्फत ६० वर्ग सुरु करण्यास शासनाने सोमवारी मान्यता दिल्याने शाळा सुरु होऊनही गेली दोन महिने शाळेबाहेर राहिलेल्या हजारो विद्यार्थ्यांची नववीतील प्रवेशाची समस्या सुटली आहे.
पालघर : या जिल्ह्यात जिल्हा परिषदेमार्फत ६० वर्ग सुरु करण्यास शासनाने सोमवारी मान्यता दिल्याने शाळा सुरु होऊनही गेली दोन महिने शाळेबाहेर राहिलेल्या हजारो विद्यार्थ्यांची नववीतील प्रवेशाची समस्या सुटली आहे. जिल्ह्यातील ९ वीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशाचा प्रश्न एका बाजूने मार्गी लागत असताना स्वातंत्रोत्तर काळात जिल्हा परिषदेमार्फत नववीचे वर्ग प्रथमच सुरु होत असल्याने हा निर्णय ऐतिहासिक ठरला आहे.
पालघर जिल्ह्यात ८ वी उत्तीर्ण होऊन ९ वीत प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांची संख्या जास्त व शाळा त्यामानाने अपुºया पडत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पालकमंत्री विष्णू सवरा, आमदार पास्कल धनारे, जिल्हा परिषद अध्यक्षा सुरेखा थेतले, उपाध्यक्ष सचिन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी व शिक्षणाधिकाºयांनी गेल्या महिन्यात शिक्षणमंत्र्यांची यासंदर्भात भेट घेतली. त्यानंतर शिक्षणमंत्र्यांच्या सांगण्यावरून जिल्हापरिषदेतील अशा शाळांचे प्रस्ताव मंत्रालयीन पातळीवर पाठविण्यात आले याचबरोबरीने या प्रश्नाचे गांभीर्य पाहता आदिवासी विकास विभागानेही यासंबंधीचे आपले प्रस्ताव पाठविले होते.
मंत्रालयीन पातळीवर पालकमंत्री सवरा, आमदार धनारे, आमदार अमित घोडा यांच्यासह जिल्हा परिषदेच्या शिष्टमंडळाने वारंवार पाठपुरावा केल्यानंतर काल शिक्षणमंत्र्यांशी झालेल्या चर्चेअंती त्यांनी जिल्ह्यातील ६० जिल्हा परिषद शाळांना ९ वी व १० वीचे वर्ग सुरु करण्यास मान्यता दिली.अशा वर्गाना मान्यता देणारा पालघर हा महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा ठरला आहे.