एस.टी.ला. अपघात, चालकासह ५ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 10:34 PM2019-06-19T22:34:09+5:302019-06-19T22:34:18+5:30

बसच्या ड्रायव्हर केबिनचा चक्काचूर; ट्रकने दिली जबरदस्त टक्कर

S.L.L. Accident, driver injured 5 | एस.टी.ला. अपघात, चालकासह ५ जखमी

एस.टी.ला. अपघात, चालकासह ५ जखमी

Next

बोईसर : मुंबई-अहमदाबाद या राष्ट्रीय महामार्गाला जोडणाºाा बोईसर-चिल्हार रस्त्यावर आज सकाळी बस आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण टक्करीमध्ये बस चालकासह बसमधून प्रवास करणारे पाच प्रवासी जखमी झाले होते. सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार करून सोडण्यात आले आहे. मात्र या अपघातानंतर दोन्ही बाजूची वाहतूक खोळंबून वाहनांच्या तीन ते चार कि.मी.पर्यंत रांगा लागल्या होत्या.

या अपघातात बसचालक उध्दव कंठाले यांच्या दोन्ही गुडघ्याला मार लागला होता त्यांना उपचारासाठी नागझरी येथील अधिकारी लाईफ लाईन या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तर बसमधील प्रवासी ज्ञानदेव आबाळे व शैला आबाळे, अतळापूर, ता.संगमनेर हे पती-पत्नी तर सुंगधाबाई हापाळे, बदगी- बेलापूर, ता.अकोले, दिगू पंडित, दांडीपाडा, बोईसर व धनंजय पाटील, काटकर पाडा, बोईसर या सर्व जखमींवर बोईसर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करून सर्वांना घरी पाठविले आहे.

बुधवारी (दि.१९) सकाळी ८ वाजता बोईसर आगरातून अहमदनगरकडे जाणारी (एमएच २०, बीएल २८८३) बस गुंदले गावाच्या हद्दीतील वाघोबा खिंड उतरून सेंट फ्रान्सिस स्कूलसमोर सव्वा आठच्या सुमारास आली असता बस व ट्रकची समोरासमोर धडक झाली. यावेळी बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटून रस्त्याच्या कडेच्या नाल्यात जाऊन चालकासह ५ प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली.या अपघातात बसच्या ड्रायव्हर केबिनचा चक्काचूर झाला तर ट्रकचे बॉनेट व दरवाजा तुटून डिझेल टाकी फुटली.

अपघात झाल्यानंतर पालघर विभागाचे विभागीय वाहतूक अधिकारी आशीष चौधरी, बोईसर एस.टी.डेपोचे व्यवस्थापक प्रमोद तेलवेकर, बोईसर स्थानक प्रमुख दिनकर राठोड इत्यादी अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन जखमींना उपचार मिळावे म्हणून प्रयत्न केले त्या नंतर प्रत्येक जखमी ना रू.५०० ची मदत देऊन पुढील उपचारासाठी टी-फॉर्म दिला.

बोईसर-चिल्हार हा रस्ता मुंबई-अहमदाबाद या राष्ट्रीय महामार्गाला जोडत असल्याने या महत्त्वाच्या रस्त्यावरून दिवस-रात्र प्रचंड अवजड वाहतूक होत असून या रस्त्याचे मागील २ वर्षापासून काम सुरू आहे. या रस्त्यावर आजपर्यंत अनेक अपघात होऊन शेकडो जणांचा जीव गेला असून अजून किती बळी घेणार असा संतप्त प्रश्न विचारला जात आहे.

Web Title: S.L.L. Accident, driver injured 5

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात