विरोधकांचे अब तक ५६ करू- शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 12:24 AM2019-04-13T00:24:02+5:302019-04-13T00:24:16+5:30
नालासोपाऱ्यात महायुतीचा मेळावा : बविआला अप्रत्यक्ष इशारा
वसई : पालघर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचारार्थ गुरूवारी संध्याकाळी नालासोपारा येथे झालेल्या मेळाव्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी ५६ पक्ष एकत्र आल्याचे सांगणाºया महाआघाडीचे अबतक छप्पन केले जाईल असा इशारा अप्रत्यक्षपणे बहूजन विकास आघाडीला दिला आहे.
याप्रसंगी उपस्थित मंडळींना संबोधित करताना महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांचा जास्तीत जास्त मतांच्या फरकाने विजय मिळविण्यासाठी आपण सर्वांनी एकजूटीने पाहिजे असे आवाहन केले. पाण्यासाठी नगरसेवकांना पैसे द्यावे लागतात, ही शरमेची बाब आहे. शिट्टी निशाणी गेली तर त्यांचे हात पाय लटपटायला लागलेत. अशा हरणाºया घोड्यावर पैसे (मतं) लावू नका.असे आवाहन शिंदे यांनी यावेळी केले.
तसेच कब्रस्तानचा प्रश्र्न सोडवण्यात आला आहे, २९ गावेही वगळण्यात येणार आहेत. आता वसई विरार मध्ये मेट्रो आणण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. याप्रसंगी राजेंद्र गावित, राज्यमंत्री रविंद्र चव्हाण, आमदार व शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख रविंद्र फाटक, राज्यमंत्री ज्योती ठाकरे, जिल्हा प्रमुख वसंत चव्हाण, लोकसभा संघटक श्रीनिवास वणगा, आर.पी.आय.पालघर जिल्हा अध्यक्ष ईश्वर धुळे, आगरी सेनेचे पालघर अध्यक्ष जनार्दन पाटील आदी उपस्थित होते.
महापालिका जहागिरी नाही
बांधकाम परवान्यासाठी स्क्वेअर फुट नुसार पैसे उकळले जातात. त्यांनी महापालिकेला स्वत:ची जागीर करून ठेवली आहे. त्यांची ही गल्लीबोळातील गुंडिगरी संपवली जाईल असा इशारा शिंदे यांनी दिला.