...तर मी भाजपाचा प्रचार केला असता; उद्धव ठाकरेंची फटकेबाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 02:53 AM2018-05-26T02:53:16+5:302018-05-26T02:53:16+5:30
गरज सरो, वैद्य मरो हे भाजपाचे धोरण : उद्धव ठाकरे यांची मोखाड्यात फटकेबाजी
मोखाडा : जर श्रीनिवासला भाजपाने उमेदवारी दिली असती तर मी भाजपाचा प्रचार करायला आलो असतो मात्र भाजपा ने ‘गरज सरो वैद्य मरो’ अशी परिस्थिती निर्माण केल्यानेच शिवसेनेने श्रीनिवासला उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला असा टोला उद्धव ठाकरे यांनी हाणला आहे. गुरुवारी मोखाड्यामध्ये शिवसेनेने घेतलेल्या प्रचार सभेत त्यांनी भाजपाच्या धोरणांवर कडाडून हल्ला केला.
ज्या पक्षासाठी चिंतामण वणगा यांनी यातना सहन केल्या, पक्ष वाढवला तो पक्ष वणगा ना विसरला तर पक्षात प्रवेश पाहिजे असल्यास थैली दाखवा पक्षात प्रवेश देतो असा प्रवत्तीचा हा पक्ष असून माझी थैली मात्र ही जीवाभावाची माणसे आहेत असे ही ते म्हणाले. कॉग्रेस मधून भाजपामध्ये आलेल्या गावितांना विधानसभेची उमेदवारी दीड वर्षा पुर्वीच घोषित होते तर मग श्रीनिवासची लोकसभेची उमेदवारी घोषित करायला उशिर का केला? असा प्रश्न देखील ठाकरे यांनी उपस्थित केला. त्याचप्रमाणे भाजपाचा विजय झाला तर चिंतामण वणगांना आंनद होईल तर मग श्रीनिवास चा पराभव झाला तर वणगांना आनंद होईल का ? अशा खालच्या पातळीवर जावुन भाजपा नेते प्रचार करत असल्याचा आरोप उध्दव ठाकरे यांनी केला.
या प्रचार सभे दरम्यान मोखाड्यातील भाजपाचे माजी सभापती जयराम निसाळ, गंगाधर निसाळ, मतिन शेख, प्रविण दुर्गुडे, विजय कोठेकर व कार्यकर्त्यांनी सेनेत प्रवेश केला. या सभेस ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, खासदार अनिल देसाई, आरोग्य मंञी डॉ.दिपक सांवत, उदयबंधु पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम, तालुका प्रमुख
अमोल पाटील, व हजारो च्या संख्येने कार्यकर्ते व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.