वसईत सामाजिक कार्यकर्ते प्रा. डिमेलो यांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2019 11:40 PM2019-07-06T23:40:36+5:302019-07-06T23:40:38+5:30

तहसीलमधील घटना। अदखलपात्र गुन्हा

Social Worker Prof. Dilemma beaten up in tahasil office | वसईत सामाजिक कार्यकर्ते प्रा. डिमेलो यांना मारहाण

वसईत सामाजिक कार्यकर्ते प्रा. डिमेलो यांना मारहाण

Next

वसई : सामान्य गोर-गरीबांबर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडून शासकीय यंत्रणेकडे पाठपुरावा करणाºया वसईच्या नंदाखाल स्थित सामाजिक कार्यकर्ते प्रा.स्टीफन डिमेलो यांना नेल्सन रिबेलो नामक इसमांकडून मारहाण, धक्काबुकी करण्यात आल्याची घटना बुधवारी वसईच्या तहसीलदार कार्यालयात घडली आहे.


दरम्यान या प्रकरणी पीडित प्रा.स्टीफन डिमेलो यांच्या तक्रारीवरून वसईत पोलिसांत नेल्सन रिबेलो याच्या विरोधात भा.द.वि ३२३ अंतर्गत अदखलपात्र गुन्ह्याची नोंद दाखल करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक पुकळे यांनी लोकमतला दिली.


तक्रारदार प्रा.स्टीफन डिमेलो यांच्या सांगण्यानुसार मी कामानिमित्त वसई तहसीलदार कार्यालयात बुधवारी दुपारी ३ वाजता गेलो असता तिथे अचानक रिबेलो यांनी सर्व कर्मचाऱ्यांच्या समोर मारहाण केली. प्रसंगी कार्यालयाच्या खाली आल्यावर देखील जीवे मारण्याची धमकी दिल्याचे सांगितले.


तहसीलदार कार्यालयातच बुधवारी दुपारी ही घटना घडल्याने वसईत तालुक्यात कायदा सुव्यवस्थतेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
त्यामुळे दस्तुरखुद्द तहसीलदार किरण सुरवसे त्यांच्या दालनात कार्यरत असताना घडलेल्या या मारहाण प्रकरणांची पोलिसांनी सखोल चौकशी करावी, अशी मागणी प्रा.डिमेलो यांनी केली असून आपण या प्रकरणी पालघर पोलीस अधीक्षक आणि पोलीस महासंचालक यांच्याकडे लेखी तक्र ार करणार असल्याचेही शेवटी प्रा.डिमेलो यांनी लोकमतला सांगितले . यामुळे शहरात हा चर्चेचा विषय ठरला आहे. तर पुढे काय कारवाई होते. याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.


‘प्रा.स्टीफन डिमेलो कोण आहेत? अथवा कोणी आणि कुणाला मारहाण केली किंबहुना बुधवारी दुपारी वसई तहसीलदार कार्यालयात अशी मारहाणीची कुठलीही घटना माझ्या कानावर आलेली नाही त्यामुळे अधिक माहिती घेतो.
- किरण सुरवसे,
वसई तहसीलदार

Web Title: Social Worker Prof. Dilemma beaten up in tahasil office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.