वसई, विरारमध्ये टँकरचा सुळसुळाट; गळती धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2019 11:37 PM2019-02-09T23:37:16+5:302019-02-09T23:37:24+5:30

वसई-विरार शहरात अनिधकृत टँकरचा सुळसुळाट झाला आहे. या टँकरचालकांकडून सुरक्षेच्या कुठल्याच नियमांचे पालन केले जात नसल्याने नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.

 Solar water tank in Vasai, Virar; Leakage dangerous | वसई, विरारमध्ये टँकरचा सुळसुळाट; गळती धोकादायक

वसई, विरारमध्ये टँकरचा सुळसुळाट; गळती धोकादायक

Next

पारोळ : वसई-विरार शहरात अनिधकृत टँकरचा सुळसुळाट झाला आहे. या टँकरचालकांकडून सुरक्षेच्या कुठल्याच नियमांचे पालन केले जात नसल्याने नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. गेल्या पाच वर्षांत बेदरकार टँकर चालकांकडून शहरात १०० हून अधिक मोठे अपघात झाले असून त्यात ३७ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. टँकरचालकांना गर्दीच्या वेळेत रस्त्यावर बंदी घालणारा प्रस्तावही धूळ खात पडला आहे. वसई फाटा ते वसई, नालासोपारा फाटा ते सोपारा, शिरसाड ते विरार या मार्गावर गळक्या टँकरच्या वाहतुकीमुळे सकाळी व संध्याकाळी रहदारीच्या वेळे तच हे मार्ग ओले होत असल्याने अपघाताची टांगती तलवार आजमतिीला ही नागरिकांच्या मानेवर आहे.
वसई-विरार शहरात ६०० हून अधिक टँकर आहेत. एकटयÞा नालासोपारा शहरात २५० टँकर आहेत. मात्र टँकरचालकांकडून सुरक्षेच्या नियमांचे पालन केले जात नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्याला आळा घालावा अशी मागणी आहे.

टँकरना बंदी घालण्याच्या प्रस्तावाचे काय झाले?
मागील पाच वर्षांत टँकरचालकांकडून शहरात एकूण १०५ अपघात झाले आहेत. ज्यात ३७ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. याशिवाय ६८ जणांना गंभीर दुखापत होऊन त्यातील काही जणांना कायमचे अपंगत्व आले आहे. तर टँकरमधून पाणी सांडणे नित्याची बाबत आहे. मात्र पाण्याच्या वाहतुकीस सदोष टँकरचा वापर केला जातो.वाहतूक कोंडी आणि अपघातांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी सकाळ आणि संध्याकाळच्या वेळी टँकरना शहरात बंदी घालण्याचा प्रस्ताव तयार केला होता. या प्रस्तावानुसार सकाळी ८ ते दुपारी १ आणि संध्याकाळी ५ ते ९ या वेळेत टँकरचालकांवर शहरात वाहतुकीसाठी बंदी घालण्यात येणार होती.

Web Title:  Solar water tank in Vasai, Virar; Leakage dangerous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.