तारापूर एमआयडीसीतील घनकचरा रस्त्यावर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2018 11:53 PM2018-08-21T23:53:48+5:302018-08-21T23:54:55+5:30
पावसामुळे प्रदुषणाचा धोका; महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अटी शर्तींना फाटा
- पंकज राऊत
बोईसर : तारापूर एमआयडीसीतील रासायनिक कारखान्यातून निघालेला सुमारे १४ टन घातक घनकचऱ्याच्या सुमारे दोनशे गोणी बोईसर - चिल्हार फाटा या मुख्य रस्त्याच्या कडेला तसेच महामार्गावर उघड्यावर टाकण्यात आल्या आहेत.
रासायनिक कारखान्यातून निघणाºया घनकचºयाच्या विल्हेवाटी करीता मुंबई वेस्ट मॅनेजमेंटच्या सामुदायिक घनकचरा विल्हेवाट प्रक्रि या केंद्राकडे पाठविण्याच्या प्रदुषण नियंत्रणच्या सूचना असताना अनेक कारखाने त्याकडे दुर्लक्ष करुन रात्री अंधाराचा फायदा घेऊन उघड्यावर टाकण्याच्या घटना वाढल्या आहेत. विषेश म्हणजे हा कचरा प्रक्रीयेद्वारे विल्हेवाट लावण्याच्या अटी व शर्ती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) कडून कारखान्यांना दिलेल्या संमतीपत्रात (कन्सेंट) मध्ये आहेत. अहोरात्र चालणाºया बोईसर ते मुंबई-अहमदाबाद महामार्गाला जोडणाºया चिल्हार फाटा या मुख्य रस्त्यावरील वाघोबा खिंड, चिर व महामार्गावरील मेंडवड खिंडीत उघड्या वर टाकल्याने धोका वाढला आहे. पावसामुळे तो विरघळून रसायन मिश्रीत पाणी शेतात पसरण्याची शक्यता असून ते पाणी गुरांनी प्यायल्यास त्यांनाही धोका उद्भवू शकतो असे तज्ज्ञांचे मत आहे. विशेष म्हणजे जेव्हा घनकचरा विल्हेवाटी करीता मुंबई वेस्ट मॅनेजमेंटकडे पाठविण्यात येतो तेव्हा इन्व्हाईसच्या पाच प्रती काढून पहिली कॉपी तसेच वेगवेगळ्या उत्पादन प्रक्रि येनंतर निघालेला घनकचरा व विल्हेवाटीसाठी पाठविलेला कचरा याचा संपुर्ण तपशील एमपीसीबी (तारापूर -एक) उपप्रादेशिक कार्यालयात पाठविणे बंधनकारक असते. मात्र, अश्या पद्धतीने तो उघड्यावर टाकून कराराचा भंग होत आहे.
नमूने पृथक्करणानंतर लागणार ‘त्या’ कारखान्यांचा शोध
एमपीसीबीच्या तारापूर दोन या कार्यालयातून हा घनकचरा मुंबई वेस्ट मॅनेजमेंटकडे विल्हेवाटीसाठी पाठविण्याची प्रक्रि या सुरू क रण्यात आली असून कचºयाचे नमुने पृथक्करणासाठी एमपीसीबीच्या व मुंबई वेस्ट मॅनेजमेंटच्या प्रयोग शाळेत पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल प्राप्त होताच तो कचरा कुठल्या उद्योगाचा हे कळणार आहे.
अवैधरीत्या टाकलेला घन कचरा उचलण्यात येत असून लवकरच आम्ही तो कचरा कुठल्या कारखान्याचा होता त्याचा शोध घेऊन कठोर करवाई करू
- डॉ. अर्जुन जाधव,
उप प्रादेशिक अधिकारी (एमपीसीबी, तारापूर-२)