गुराख्याचा मुलगा कॉमेंट्रिटर

By admin | Published: November 14, 2016 03:44 AM2016-11-14T03:44:44+5:302016-11-14T03:44:44+5:30

विक्रमगड : वांगणपाडा येथील लाडक्या ४ थी पास असून तो क्रिकेटच्या सामन्याचे उत्तम समालोचन करतो. रेडिओवरील कॉमेंट्री ऐकून तो हिंदी व समालोचन शिकला.

The son of Gurukha commentator | गुराख्याचा मुलगा कॉमेंट्रिटर

गुराख्याचा मुलगा कॉमेंट्रिटर

Next

विक्रमगड : वांगणपाडा येथील लाडक्या ४ थी पास असून तो क्रिकेटच्या सामन्याचे उत्तम समालोचन करतो. रेडिओवरील कॉमेंट्री ऐकून तो हिंदी व समालोचन शिकला. परिस्थिती बिकट असल्यामुळे तो गुराख्याचे काम करतो. असे असूनही त्याचे हिंदीवरील प्रभुत्व आणि क्रिकेटची जाण, ज्ञान जबरदस्त आहे. सध्या विक्रमगड तालुक्यामध्ये विविध ठिकाणी क्रिकेटच्या टुर्नामेन्ट चालू असून त्यास खास बोलाविले जाते. त्याने सांगितले की, घरात कमावते फक्त माझे वडील असल्याने मी स्वत: गुरे चारतो. घर चालविण्यासाठी मदत करीत असतो. गुरे चारताना विरंगुळा म्हणून कानाला रेडिओ लावून कॉमेंट्री ऐकण्याचा छंद मला जडला. त्यामुळे मी आज उत्तम प्रकारे हिंदीमध्ये क्रिकेट समालोचन करण्याची कला अवगत केली आहे़ व मला यामुळे अनेक विभागात मोठ्या शहरातील क्रिके्रट सामान्यामध्ये मोबदला देऊन समलोचना करीता आवर्जून बोलाविले जाते ़ त्यातून मला आर्थिक मदतही होते़ परंतु आता माझे स्वप्न आहे ते टी़ व्ही चॅनलवर समालोचन करण्याचे.
लाडक्या भोये हा एक उत्तम हिंदी क्रिकेट समालोचक असून त्याला टी. व्ही चॅनल्स, रेडीओ आदींवर कॉमेंट्री करण्याची संधी द्या असे मत विक्रमगड स्पोर्टस क्लबचे जेष्ठ क्रिकेटर नितीन तामोरे यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले आहे. (वार्ताहर)

Web Title: The son of Gurukha commentator

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.