वसईत किवाच्या मासेमारीला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 01:13 AM2019-09-21T01:13:23+5:302019-09-21T01:13:27+5:30

वसई तालुक्यात किव, भोक्षी, पाग यांच्या माध्यमातून मासेमारीला वेग आला आहे.

The speed of Kiva fishing in the area | वसईत किवाच्या मासेमारीला वेग

वसईत किवाच्या मासेमारीला वेग

Next

पारोळ : वसई तालुक्यात किव, भोक्षी, पाग यांच्या माध्यमातून मासेमारीला वेग आला आहे. गणेशोत्सवानंतर या गावठी माशांना बाजारात मागणी वाढली असून त्यातून चांगला दर मिळत असल्याने हे रोजगाराचे एक नवे साधन निर्माण झाले आहे.
जून महिन्यात प्रजननक्षम वल्गन चढलेल्या माशांनी सोडलेल्या बिजाचे आता मोठ्या स्वरुपातील माशांमध्ये रूपांतर झाले असून सतत मुसळधार पाऊस कोसळत असल्याने माशांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. हे मासे शेतात, ओहोळात, नाल्यात आणि नदीत सापडत असून त्यासाठी ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर भात शेती लागवडीनंतर सध्या कमी असलेल्या शेतीच्या कामांमुळे पांग टाकून, झोळणीने, भुसा वापरून, गळ सोडून तसेच किव मांडून मासेमारी करताना दिसतात. यातून ते चांगल्या प्रकारे रोजगार कमवत आहेत. अशा प्रकारे पकडलेले मासे हे ताजे व चविष्ट असल्याने ते खरेदी करण्यासाठी खवय्येही लागलीच मिळत आहेत. त्यामुळे एका दिवसाला एकाला पाचशे ते हजार रुपयांची कमाई होत असल्याचे मासेमार सांगत आहेत.
यंदा वसईत चांगला पाऊस झाल्याने शेतात, डबक्यात, नदी-नाल्यात, ओहोळात माशांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणावर झाली. ते पकडून त्यांच्या विक्रीतून रोजगार निर्मिती होत आहे. त्यामुळे शेतकरी तसेच शेतमजूर मासेमारी करत असून त्यांच्या हाताला काम मिळत असून खर्चायला चार पैसेही मिळत आहेत.

Web Title: The speed of Kiva fishing in the area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.