उधाणाने जनजीवन विस्कळीत

By Admin | Published: May 9, 2016 01:50 AM2016-05-09T01:50:18+5:302016-05-09T01:50:18+5:30

गेल्या तीन दिवसांपासून डहाणू आणि बोर्डी परिसरातील समुद्रकिनाऱ्यालगतच्या गावांना भरतीचा तडाखा बसला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Spoof life disorder | उधाणाने जनजीवन विस्कळीत

उधाणाने जनजीवन विस्कळीत

googlenewsNext

डहाणू/बोर्डी : गेल्या तीन दिवसांपासून डहाणू आणि बोर्डी परिसरातील समुद्रकिनाऱ्यालगतच्या गावांना भरतीचा तडाखा बसला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. झाई गावातील किनाऱ्यालगतचे रस्ते पाण्याखाली गेले असून काही घरांमध्ये पाणी घुसले आहे. दरम्यान शेतजमिनीत क्षारयुक्त पाणी शिरल्याने जमिनी नापीक होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
पावसाळा जवळ येत असून, समुद्राच्या भरतीचा तडाखा अधिक तीव्रपणे जाणवत आहे. ६ मे रोजीच्या अमावस्येपासून समुद्राला मोठ्या प्रमाणावर भरती येत आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून किनाऱ्यालगत गावांमधील रस्ते जलमय होत असून, काही घरांमध्ये उधाणाचे पाणी घुसते आहे. नरपड, घोलवड, बोर्डी आणि झाई या गावातील काही भागात भरतीची उच्चतम रेषा ओलांडून समुद्राचे पाणी घुसले. रविवार, ८ मे रोजी दुपारी महाराष्ट्र गुजरात सीमेवरील झाई गावातील पूल भरतीच्या पाण्याखाली गेल्याने काहीकाळ त्याचा राज्याशी संपर्क तुटला होता. याही परिस्थितीत जीवनावश्यक गरजांची पूर्तता करण्यासाठी काही नागरिकांनी जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडण्याचा धोकादायक प्रयत्न केला. परंतु सुदैवाने दुर्घटना घडली नाही. झाई पुलाचे काम डहाणू सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मंजूर करण्यात आले (वार्ताहर)

Web Title: Spoof life disorder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.