वसईत रमजान ईद साठी शिरखुर्म्याच्या तयारीला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 11:27 PM2019-06-03T23:27:30+5:302019-06-03T23:27:44+5:30

दूध खजूर : सुका मेव्याची मागणी वाढली

Sprinkle speed for Vasudeet Ramzan Eid | वसईत रमजान ईद साठी शिरखुर्म्याच्या तयारीला वेग

वसईत रमजान ईद साठी शिरखुर्म्याच्या तयारीला वेग

Next

पारोळ : रमजान ईदच्या निमित्ताने वसई तालुक्यातील मुस्लिम बांधवांच्या घरी ईद साठी खास बनविण्यात येणाऱ्या शिरखुर्म्याच्या तयारी वेग आला आहे. रमजान ईद सणाची गोडी वाढते ती शिरखुर्म्यामुळे. ईदला अजून काही दिवस बाकी असले तरी घरोघरी शिरखुर्म्याची तयारी सुरू झाली आहे. शिरखुर्म्यासाठी लागणाºया वस्तू खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी दिसत आहे. बहुतांश महिलांनी या वस्तू खरेदीही केल्या आहेत.

रमजान ईदचा खास मेन्यू म्हणजे शिरखुर्मा ईदच्या दिवशी प्रत्येक मुस्लिम कुटुंबाच्या घरी बनणारा हा पदार्थ. , कुटुंब किती मोठे, ईदच्या दिवशी किती पाहुणे घरी येणार आहेत आणि किती जणांच्या घरी शिरखुर्मा पाठवायचा आहे, यावरून शिरखुम्यार्साठी किती सामान आणायचे, हे ठरवले जाते. काही घरांमध्ये तर १० ते १५ लिटर दुधाचा शिरखुर्मा बनविला जातो. बदाम, काजू, खोबरे, किसमिस, पिस्ता, अक्र ोड, शेवया, खजूर, अंजीर, जर्दाळू चारोळी असा सुकामेवा शिरखुर्म्यासाठी वापरण्यात येतो. अनेक घरांत आता या गोष्टींची खरेदी झाली असून, खोबरे किसून ठेवणे, बदाम सोडून इतर सुकामेव्याचे तुकडे करून ठेवणे, खजुरातून बिया काढून ठेवणे हे काम सुरू आहे. ईदच्या दिवशी खूप मोठ्या प्रमाणावर शिरखुर्मा बनवावा लागत असल्यामुळे या गोष्टींची तयारी आठवडाभर आधीपासूनच सुरू होते.
ईदच्या आदल्या दिवशी रात्री बदाम पाण्यात भिजवत टाकतात आणि मग दुसया दिवशी त्याचे साल काढून बारीक तुकडे केले जातात. हे तुकडे मग शिरखुर्म्यात टाकले जातात. काहीजण हे पदार्थ आधीच तळून ठेवतात.

पूर्वी खजूर हे सौदी अरेबियाचे मुख्य पीक होते. मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असल्यामुळे तेथील सगळ्यांना सहज घेणे शक्य व्हायचे. अशा या शिरखुर्म्याचा स्वाद बुधवारी ईद च्या दिवशी घेतला जाणार असून हिंदू बांधवांच्या घरी तो ईद ची भेट म्हणून दिला जातो.

शिरखुर्माच का बनवितात?
ईदला शिरखुर्माच का बनविला जातो, याविषयी सांगताना मुस्लिम समाजातील ज्येष्ठ व्यक्ती सांगतात की, मूळ शिरखुर्मा म्हणजे दूध आणि खजूर यांचेच मिश्रण होय.

दूध म्हणजे शिर आणि खुर्मा म्हणजे खजूर या दोन्हींच्या मिश्रणातून शिरखुर्मा तयार झाला. काळानुसार आवड आणि बदलत जाणाºया खाद्यसंस्कृतीमुळे यात अनेक बदल झाले. शेवया व इतर सुकामेवाही शिरखूर्मामध्ये येत आहे.

Web Title: Sprinkle speed for Vasudeet Ramzan Eid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.