एसआरटी पद्धत ठरते वरदान , कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारी पद्धत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 12:37 AM2017-10-07T00:37:11+5:302017-10-07T00:37:27+5:30

तालुक्यातील शेतक-यांनी आता पारंपरिक भात शेतीला छेद देत आधुनिक पद्धतीने व नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून भात शेती करायला सुरूवात केली आहे

The SRT method determines boon, a method to give higher yields at a lower cost | एसआरटी पद्धत ठरते वरदान , कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारी पद्धत

एसआरटी पद्धत ठरते वरदान , कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारी पद्धत

googlenewsNext

वसंत भोईर
वाडा : तालुक्यातील शेतक-यांनी आता पारंपरिक भात शेतीला छेद देत आधुनिक पद्धतीने व नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून भात शेती करायला सुरूवात केली आहे. यामध्ये एसआरटी व मिल्चंग पध्दत अशा अनेक पध्दतीने भात शेती करत आहेत. एसआरटी ही पध्दतीत कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारी असल्याने ती आता शेतकºयांसाठी वरदान ठरत आहे.
तालुक्याला भाताचे कोठार म्हणून संबोधले जाते. वाड्याचा वाडा कोलम हा भाताचा वाण राज्यभर प्रसिद्ध असून वाशी (नवी मुंबई) व मुंबईच्या बाजारापेठेत त्याला विशेष मागणी आहे. विशेष म्हणजे हा तांदळाचा अगदी लहान दाणा आणि चवीला व पचायला हलका अशी त्याची वैशिष्ट्य असल्याने राज्यभर तो प्रसिद्ध आहे. येथील शेतकरी पारंपारिक शेती करीत असतानाच आता आधुनिकतेकडे वळले आहेत. काही शेतकरी भाताच्या पध्दतीत आमुलाग्र बदल करून नवनवीन प्रयोग करत आहेत.
आता येथील काही शेतकºयांनी एसआरटी (सगुणा राईस टेक्नॉलॉजी) या पद्धतीचा अवलंब करून शेती केली आहे. या पध्दतीत सर्वप्रथम जमिनीत वाफे केले जातात. त्यानंतर पाणी पडल्यानंतर बियाणे वाफ्यात टाकले जाते. त्यामुळे भात लावणी, बेणणीचा खर्च येत नाही. तसेच मजूरही कमी लागतात. त्यामुळे कमी खर्चात जास्त उत्पन्न या पद्धतीत शेतकºयांना घेता येते. एकरी फक्त सात ते आठ हजार रूपयांचा खर्च या पध्दतीत येतो. एका बिजापोटी सुमारे ६५ ते ७० फुटवे आता आल्याने भरघोस उत्पन्न आले आहे.
ही पध्दत राबविताना कंपनीचे संचालक चंद्रशेखर भडसावले यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. ते शेतकºयांना निशुल्क माहिती देतात असेही चौधरी यांनी सांगितले. शेतकºयांनी पारंपारिक शेतीला छेद देत आधुनिक आणि नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळू शकते. असे त्यांचे म्हणणे आहे. किशोर चौधरी यांनी भाताबरोबर आपल्या शेतात शेवगा, लिंबू, आंबा व मोगरा यांची झाडे लावली असून त्यातून ते उत्पन्न घेत आहेत.
एकदा वाफे घ्या, दहा वर्षे वापरा
घोणसई येथील प्रयोगशील शेतकरी किशोर चौधरी हे मुंबई महानगर पालिकेतून सेवा निवृत्त झाल्यानंतर त्यांनी आता आपल्या शेतीत नवनवीन प्रयोग सुरू केले आहेत.
एसआरटी पध्दतीत त्यांनी आपल्या एक एकर जमीनीवर लावली असून आता हे भरपूर पीक आले आहे. या पध्दतीत किमान पिक तयार व्हायला १२० दिवस लागतात. तसेच हळव्या व गरव्या या दोन्ही शेतीत ही पध्दत होते असे त्यांचे म्हणणे आहे. शिवाय एकदा वाफे तयार केले की, पुढील दहा वर्षांत हेच वाफे वापरता येतात. तसेच वर्षातून या वाफ्यात तीन पिके घेता येतात. भात कापणीनंतर भाजीपाला व कडधान्ये अशी पीक घेता येतात.

Web Title: The SRT method determines boon, a method to give higher yields at a lower cost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.