टप-यांचा तारांकित प्रश्न झाला बेदखल, उड्डाणपुलाखालील टप-या हटविण्यास नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटीकडून दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 02:23 AM2017-09-24T02:23:52+5:302017-09-24T02:23:55+5:30

मुंबई अहमदाबाद महामार्गावर तलासरी येथील उड्डाणपुलाखाली अनधिकृत टप-या उभारण्यात आल्या असून त्या ठिकाणी अनेक ज्वलनशिल पदार्थ दिवस रात्र उघड्यावर असतात.

A Star question has been withdrawn, neglected by the National Highway Authority to remove the flyover under the flyover. | टप-यांचा तारांकित प्रश्न झाला बेदखल, उड्डाणपुलाखालील टप-या हटविण्यास नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटीकडून दुर्लक्ष

टप-यांचा तारांकित प्रश्न झाला बेदखल, उड्डाणपुलाखालील टप-या हटविण्यास नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटीकडून दुर्लक्ष

Next

- सुरेश काटे ।

तलासरी : मुंबई अहमदाबाद महामार्गावर तलासरी येथील उड्डाणपुलाखाली अनधिकृत टप-या उभारण्यात आल्या असून त्या ठिकाणी अनेक ज्वलनशिल पदार्थ दिवस रात्र उघड्यावर असतात. त्यातच येथील वाहतूक कोंडीला सुद्धा हा प्रकार कारणीभूत आहे. विशेष म्हणचे या प्रकरणी नॅशनल हायवे अथॉरिटीकडून (एन.एच.ए) या प्रकरणी कोणतीही कारवाई होत नसल्याने विधीमंडळात आमदार पास्कल धनारे यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केल्यानंतर तो बेदखल करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
या पुलाखाली टारगट तरुणांकडून शाळकरी तसेच महाविद्यालियन विद्यार्थीनिंची छेडछाड, तरु णाईला मोबाईल मध्ये अश्लील चित्रिफती भरून देणारे उद्योग, १९ किलो गॅस सिलेंडरचा वापर करून चालणारी चायनीजची दुकाने यामुळे तलासरी उड्डाण पुलाला धोका निर्माण झाला आहे. या उड्डाणपुलाखालील टपर्या मुळे अपघाताचे प्रमाण वाढल्याने तलासरी पोलिसांनी एनएचए अधिकाºयांना वारंवार या टपºया हटविण्यास सांगितले परंतु त्या हटविण्यास अधिकारी जाणीव पूर्वक दुर्लक्ष करीत आहेत.
या धोकादायक उड्डाणपुला खालील टपºया काढण्या बाबत डहाणू विधान सभेचे आमदार पास्कल धनारे यांनी एन एच ऐ अधिकारी दिनेश अगरवाल व शशी भूषण यांना सांगून पुलाखालील टपºयामुळे पुलाला धोका निर्माण झाल्याचे निदर्शनात आणून दिले. परंतु, या कडे दुर्लक्ष केल्याने आमदारांनी आंदोलनाचा इशारा दिला मात्र, या इशाºयाला ही एन एच ऐ अधिकाºयांनी दाद न दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

अर्थपूर्ण संबंध असल्याची चर्चा
पुलाखाली टपरी टाकण्यासाठी दोन, तीन लाख रु पये व मासिक तीन ते चार हजार रु पये टपरी वाल्या कडून घेतले जातात ही रक्कम घेणारे अधिकारी कोण याचा शोध घेण्यात आला पाहिजे हा विषय तलासरीच्या आमसभेत चर्चेलाही आला होता मात्र, जनतेला अध्याप उत्तर मिळाले नाही.
टपºया काढण्याची कारवाई कधी करणार या बाबत नॅशनल हायवे अथॉरिटीचे अधिकारी दिनेश अगरवाल यांच्या कडे विचारणा केली असता त्यांनी टपºया काढण्यासाठी पोलीस संरक्षण मिळत नसल्याचे सांगितले तर तलासरी पोलिसांकडे विचारणा केली असता एनएचएच्या अधिकाºयांनी कोणतेही पोलीस सरंक्षण मागितले नसल्याचा निर्वाळा देण्यात आला.

सर्वच विभाग देतात बगल
या प्रकरणी आमदार धनारे यांनी तारांकित प्रश्न क्र ं ८८८९३ द्वारे हिवाळी अधिवेशनात मांडला परंतु आपल्याच पक्षाच्या आमदारांचा प्रश्न अधिवेधनात बेदखल करण्यात आल्याने धनारे हतबल झाले आहेत. तलासरी उड्डाणपुलाखालील बेकायदा टपºया काढण्या बाबत तलासरी महसूल विभागाने बगल देत हे कर्तव्य एनएचएचे असल्याचे सांगत कारवाईचा चेंडू हायवे अथॉरिटीकडे टोलवला आहे.

Web Title: A Star question has been withdrawn, neglected by the National Highway Authority to remove the flyover under the flyover.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.