वसई तालुक्यात भात पेरण्यांची लगबग सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 11:23 PM2019-06-20T23:23:25+5:302019-06-20T23:23:28+5:30
बियाणांची थैली ५० रुपयांनी महागली; मजुरांची टंचाई, ट्रॅक्टरचे भाडेही महागले
पारोळ : वसई तालुक्यात रोहिणी कोरडी गेल्या नंतर मृगात पावसाने हलकी सुरु वात केल्याने शेतकऱ्यांंनी भात पेरणीला सुरु वात केली. मात्र दोन दिवसांपासून कडक ऊन पडत असल्याने शेतकऱ्यांंमध्ये चिंतेचे वातावरण असून पाऊस पडला नाही तर पेरण्या वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
या तालुक्यात सर्वात जास्त घेण्यात येणाºया भाताच्या पेरण्यांना सुरवात झाली आहे. त्यासाठी लागणारे बियाणे म्हणून भाताच्या वाणासह इतर साहित्य खरेदी करण्यासाठी शेतकºयांंची कृषिसेवा केंद्रांवर गर्दी दिसून येत आहे . तसेच नांगरणीसाठी ट्रॅक्टर भाड्याने लागलीच मिळावे म्हणून ट्रॅक्टर मालकांकडे खेटे मारणे सुरु झाले असून तो लागलीच मिळावा म्हणून शेतकरी प्रयत्नशील आहेत.
चालू वर्षाच्या खरीप हंगामाला तालुक्यात सुरवात झाली असून पेरणीसाठी लागणारे सुधारित व संकरित भात बियाणे, खते ,औषधे ,यांची जुळवा जुळव करण्यासाठी शेतकरी कृषी सेवा केंद्रावर गर्दी करत आहेत . मात्र चालू वर्षी दरसाल वाढणाºयां महागाईचा परिणाम जाणवत असून खते, बियाणे, औषधे यांच्या सह लागणारी औजारे, नांगरणीसाठी ताशी भाड्याने घेण्यात येणारे ट्रॅक्टर यांचे भाव साधारण ५ ते १५ टक्के वाढल्याचे शेतकरी सांगत आहेत .मागील वर्षी च्या तुलनेत भात बियाण्यांच्या १० किलोच्या एका पिशवीचा असलेला दर चालू वर्षी ५० रु पयांनी वाढल्याचे शेतकरी सांगत आहेत . वाढती महागाई, मजुरांची टंचाई, वरुण राजाचा लहरीपणा, रोगराई यांचा सामना करून लागवड केलेली शेती पिकली तरी पिकाला मिळणारा भाव यांची सांगड घालताना वरील कारणांमुळे पारंपारिक पद्धतीने केली जाणारी भात शेती न परवडणारी असून दुसरे काही उत्पन्नाचे साधन नसल्याने खोट खाऊन भात शेती कसावी लागत असल्याचे शेतकºयांंचे म्हणणे आहे .यामुळे तालुक्यातील अनेक शेतकºयांंनी भात लागवडीकडे पाठ फिरवली आहे.
वसई तालुक्यात ८६४७ हेक्टर क्षेत्रात भात पिकाची लागवड होत असून मागील वर्षी ७७३३ हेक्टर मध्ये भात लागवड करण्यात आली होती. गेल्या वर्षी हेक्टर मागे २५८० किलो भात पिकाचे उत्पादन झाल्याची कृषी विभागाने माहीती दिली. पण या वर्षी पेरण्या लांबणीवर पडल्या आहेत.