राज्य सरकार कोरोनाच्या लढाईत पूर्णपणे अपयशी ठरलं - प्रवीण दरेकर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 06:11 PM2020-06-24T18:11:31+5:302020-06-24T18:48:48+5:30

वसई विरार शहरात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दरेकर यांनी पालिका प्रशासनासोबत बुधवारी एका आढावा बैठकीचे आयोजन केले होते, तर पालिकेच्या वसई आय प्रभाग समिती कार्यालयात बुधवारी झालेल्या आढावा  बैठकीनंतर दरेकर यांनी तालुक्यातील पत्रकारांशी संवाद साधला.

The state government completely failed in the battle of Corona - Praveen Darekar | राज्य सरकार कोरोनाच्या लढाईत पूर्णपणे अपयशी ठरलं - प्रवीण दरेकर

राज्य सरकार कोरोनाच्या लढाईत पूर्णपणे अपयशी ठरलं - प्रवीण दरेकर

Next
ठळक मुद्देकोविड संक्रमण संदर्भात सध्या विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे कोकण विभागाचा दौरा करीत आहे.

- आशिष राणे

वसई : राज्य सरकार कोरोनाच्या लढाईत पूर्णपणे अपयशी ठरलं नाही तर ते गडबडले असल्याचा घणाघाती आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. वसई विरार शहरात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दरेकर यांनी पालिका प्रशासनासोबत बुधवारी एका आढावा बैठकीचे आयोजन केले होते, तर पालिकेच्या वसई आय प्रभाग समिती कार्यालयात बुधवारी झालेल्या आढावा  बैठकीनंतर दरेकर यांनी तालुक्यातील पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

कोविड संक्रमण संदर्भात सध्या विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे कोकण विभागाचा दौरा करीत आहे. त्याप्रमाणे बुधवारी सकाळी 11 वाजता विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी वसई विरार महापालिकेच्या  वसई विभागीय कार्यलयात त्यांच्याच अध्यक्षतेखाली एक आढावा बैठक आयोजित केली होती. त्यावेळी आयुक्तांनी त्यांची भेट घेत कोविड संदर्भात पालिका प्रशासनाने कोणत्या उपाययोजना केल्या आहेत. याचा लेखाजोखा विरोधी पक्षनेते दरेकर यांच्यासमोर मांडला. 

या बैठकीत आयुक्त गंगाथरन. डी यांच्या समवेत महापौर प्रवीण शेट्टी, अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, प्रांत स्वप्निल तांगडे, तहसीलदार किरण सुरवसे, सभापती, नगरसेवक, पोलीस अधिकरी कर्मचारी पालिका, महसूल, आरोग्य यंत्रणा आदी विभागाचे विविध अधिकारी व भाजपाचे नेते पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते.

पालघर जिल्ह्यामध्ये कोरोनाची परिस्थिती सध्या तरी अनियंत्रित आहे. पण त्यापैकी वसई विरार महापालिका हद्दीत कोरोना रुग्ण व मयत रुग्ण संख्या दररोज वाढत आहे,त्यामुळे  येथील प्रशासकीय व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वेळीच सावध होऊन पूर्णपणे खबरदारी घेण्याची गरज आहे. अन्यथा येथे सुद्धा मुंबई व पुणे सारखी कोरोनाची स्थिती निर्माण होऊ शकते. 

तसेच, दरेकर यांनी नालासोपारा स्थित कोविड समर्पित रिद्धी विनायक रुग्णालयाची देखील पाहणी करून तेथील रूग्ण व संबंधित डॉक्टर्स व नर्सेस आदी आरोग्य यंत्रणेची माहिती घेतली. यावेळी दरेकर यांनी आयुक्तांना शहरांतील हॉस्पिटल कोविड अथवा संस्थात्मक क्वारंटाइनची स्थिती योग्य पद्धतीने हाताळावी लागेल किंवा रुग्णालय,सेंटर्स व इतर आरोग्याच्या दृष्टीने सोयीं सुविधा  वाढविण्यासाठी जिकरीचे प्रयत्न करावे असे देखील प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.
 

आणखी बातम्या...

"पंडित नेहरू नसते तर चीनचा प्रश्नच निर्माण झाला नसता", भाजपा नेत्याचे वादग्रस्त विधान

भारताचे मंत्रालय आणि कंपन्या चिनी हॅकर्सच्या निशाण्यावर - रिपोर्ट

46 वर्षांनंतर पहिल्यांदाच PPF वरील व्याजदर होऊ शकतो 7 टक्क्यांपेक्षा कमी!

'मेड इन चायना' नको तर मग 'या' ब्रँडचे खरेदी करू शकता स्मार्टफोन

Web Title: The state government completely failed in the battle of Corona - Praveen Darekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.